Kopargaon vijay kapse दि १७ जुलै २०२६: कोपरगाव शहरातील मांस विक्री करणाऱ्या काही दुकानदारांकडून विक्रीनंतर उरणारी घाण व कचरा गटारी तसेच गोदावरी नदीपात्रात टाकला जात असल्याचा आरोप करत, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने कोपरगाव नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जाहिरात
ट्रस्टचे अध्यक्ष आदीनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना गुरुवार दि १६ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध ठिकाणी मांस विक्रीनंतर उरणारा कचरा गटारीत किंवा थेट गोदावरी नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून गोदावरी नदीचे प्रदूषणही वाढत आहे.जाहिरात
यापूर्वीही गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने या विषयावर पाठपुरावा केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मांस विक्रेत्यांना योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुकाने अधिनियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टने केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टने व्यक्त केली आहे.निवेदन देतांना