आपला जिल्हा

गरिबीवर मात करत आंतरराष्ट्रीय शिपवर नोकरी; दीपक भोंगळे यांचा प्रेरणादायी प्रवास

गरिबीवर मात करत आंतरराष्ट्रीय शिपवर नोकरी; दीपक भोंगळे यांचा प्रेरणादायी प्रवास
सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा माजी विद्यार्थी
Kopargaon vijay kapse दि १७ जुलै २०२६-जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते,” याचा प्रत्यय बाळासाहेब सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज कोपरगावचा माजी विद्यार्थी दीपक प्रकाश भोंगळे यांच्या यशोगाथेतून येतो.

जाहिरात
दीपक यांचे आई-वडील कन्नड तालुक्यातील आंबा या गावी मोलमजुरी व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस त्यांनी केले. सन २०१९ मध्ये त्यांचे तालुक्यातील करंजी येथील दाजी किशोर सोनवणे  यांनी त्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला आणि कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.

जाहिरात
घरची परिस्थिती लक्षात घेता कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे व विषय शिक्षक प्रा विजय कापसे यांनी दीपक यांना शिर्डी येथील हॉटेल साई बन्सीमध्ये नोकरी मिळवून दिली. सकाळी महाविद्यालयात शिक्षण आणि दुपारनंतर हॉटेलमध्ये काम, असा त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी त्यांना दरमहा ५ हजार रुपये पगार मिळत होता. शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले.

जाहिरात
त्या अनुभवाच्या जोरावर प्रा कापसे यांनी त्यांना शिर्डीतील पंचतारांकित सन अँड सँड हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून दिली. सुरुवातीला कमी पगार असला तरी त्यांनी अनुभवाला अधिक महत्त्व दिले. सहा महिन्यांनंतर मुंबईतील “द बाईक सूरज प्लाझा” या पंचतारांकित हॉटेल  येथे त्यांना नोकरी मिळाली. जवळपास ५ वर्षे तेथे कार्यरत राहून त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले आणि परदेशात करिअर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

जाहिरात
या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. काही ठिकाणी अपयश आले, काही ठिकाणी अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही निवड झाली नाही. अनेकदा निराशा आली, पण त्यांनी हार मानली नाही. हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच सुट्टीच्या दिवशी विविध शिपिंग कंपन्यांच्या मुलाखती देत राहिले. अखेर त्यांच्या चिकाटीला यश आले. आज दीपक भोंगळे हे अबुधाबीस्थित ऑफको ऑफशॉर्स इंटरनॅशनल शिपिंग कंपनी अंतर्गत मीची शिप वर कार्यरत असून त्यांना दरमहा ९०० अमेरिकन डॉलर इतके मानधन मिळत आहे. शिपवर नोकरी करताना त्यांनी सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया, श्रीलंका, सौदी अरेबिया, दुबई, ओमान, कतार, कुवेत, इराक आणि सध्या मालदीव अशा अनेक देशांना भेट दिली आहे.

जाहिरात
या प्रसंगी दीपक यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय ते आपल्या आई-वडिलांच्या कष्टांना, दाजी किशोर सोनवणे यांच्या प्रेरणेला आणि विशेषतः सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे संस्थापक डॉ परशराम साबळे, विषय शिक्षक प्रा विजय कापसे, प्रा विशाल धारणगावकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला देत “आज मी ज्या ठिकाणी आहे, ते केवळ माझ्या मेहनतीमुळे आणि गुरुजनांचा  मार्गदर्शनामुळे असल्याचे सांगत  त्यांनी योग्य वेळी दिलेली साथ आणि विश्वास माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. असल्याचे सांगत गरिबीतून संघर्ष करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या भोंगळे यांची यशोगाथा ग्रामीण भागातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे