आपला जिल्हा

संजीवनी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांना नेटविन सिस्टिम अँड  सॉफ्टवेअर मध्ये नोकरी

संजीवनी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांना नेटविन सिस्टिम अँड  सॉफ्टवेअर मध्ये नोकरी

 ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाकडून यशाचे  सातत्य

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २२ जुलै २०२६संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने नेटविन सिस्टिम अँड  सॉफ्टवेअर या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बी.टेक कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या दोन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. विविध कंपन्यांच्या गरजेनुसार टी अँड  पी विभाग आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील  असतो, त्यानुसार टी अँड  पी विभागाला यश  मिळत आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

पत्रकात पुढे म्हटले आहे की नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या बॅन्किग आणि वित्तीय क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स आणि सेवा पुरविणाऱ्या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या विरेंद्र संजय घुले व गोकुळ संजय रक्ताटे यांची निवड केली तर इन्फर्मेशन  टेक्नॉलॉजी विभागातील अनिकेत रमेश  बडाख व शंतनू   प्रदिप होन यांची निवड केली आहे.

जाहिरात

   संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार अद्ययावत अभ्यासक्रम राबविला जातो. नामांकित कपन्यांशी  असलेले सामंजस्य करार, अनुभवी, संशोधनाभिमुख व उद्योगाशी जोडलेले प्राद्यापक विद्यार्थ्यांना तांत्रिक समस्या सोडविण्याची क्षमता विकसीत करून देतात. स्वतंत्र ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट सेल मार्फत ऍप्टिट्यूड , संभाषण कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण , मुलाखतींचा सराव, असे नियोजनबध्द प्रशिक्षण  दिल्या जाते. संजीवनीची शिस्तबध्द परंपरा, सामाजिक बांधिलकी व सह अभ्यासक्रमीय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, टीमवर्क व व्यावसायिकता विकसित होते. या सर्व घटकांच्या एकत्रित परीणामांमुळे संजीवनीचे इंजिनिअर तात्रिकदृष्ट्या  सक्षम , आत्मविश्वासपुर्ण व उद्योगस्नेही बनतात, त्यामुळेच नामांकित राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये त्यांची निवड होत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्वांचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे