आपला जिल्हा

मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

अहिल्यानगर विजय कापसे दि.११ नोव्हेंबर २०२४विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे श्रीगोंदाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे.

जाहिरात

यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा.

जाहिरात

मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे