राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि १६ मे २०२५–राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत चालणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस साप्ताहिक शाखेने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्ताने ह भ प दादा महाराज टूपके व डॉक्टर गीतांजली रायभान गायकवाड यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ देऊन गुणगौरव सोहळा संपन्न झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर झाला असून यात शिरसगाव पंचक्रोशीतील ५ माध्यमिक विद्यालयातील प्रथम गटात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर गीतांजली रायभान गायकवाड व ह.भ.प.श्री दादा महाराज टूपके यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

या निकालामध्ये शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलच्या,समृद्धी साईनाथ चौधरी,साक्षी संजय बोजगे,भक्ती जालिंदर काळे, तेजस्विनी खंडिझोड, हर्षदा मच्छिंद्र मलिक, वेदांत रविकांत भवर,समर्थ विनोदसिंग परदेशी,गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उमेश गोरक्षनाथ भुजाडे,साईनाथ विठ्ठल तांबे,रेणुका विनोद रासकर,सौ सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालय उक्कडगावचे शिंदे तेजस्विनी ज्ञानेश्वर,गायके समृध्दी राजेंद्र, निकम स्नेहल बाबासाहेब,न्यू इंग्लिश स्कूल पढेगाव शिंदे पल्लवी एकनाथ,शिंदे साक्षी संतोष,शिंदे प्रतिभा गणेश, सौ.सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालय करंजी प्रतीक्षा दत्तात्रय आहेर,जगदीश अनिल जपे,साक्षी बारकू फटांगरे,वैष्णवी कृष्णा घाडगे,मोनाली बाबासाहेब कोल्हे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाची प्रस्तावना दत्तात्रय भिंगारे यांनी करत विद्यार्थ्यांना जय शिवराय चा कानमंत्र दिला विद्यार्थी तसेच यशाकडे जाताना अनेक प्रलोभन व अडथळे येतात अशा अडथळ्यांना दूर ठेवण्यासाठी तुमच्याकडे धर्मवीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श इतिहास डोळ्यासमोर असला पाहिजे छत्रपतींचे विचार ज्यांच्याकडे आहे त्यांना कोणतीही वक्रदृष्टी यशापासून दूर नेऊ शकत नाही तुम्ही एकमेकांमध्ये जेव्हा भेटाल तेव्हा जय शिवराय या शब्दाचा वापर करा ज्या दिवशी प्रत्येक विद्यार्थिनी जय शिवराय या शब्दाचा वापर करतील त्यादिवशी तुमच्या जीवनातील भय निघून जाईल व राक्षसी विचारधारा तुम्हाला भ्रमित करणार नाही असे सांगितले.
डॉ. गीतांजली रायभान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राहणीमान कुठलाही अवडब न आणता अगदी साधेपणाची जीवन पद्धती अवलंबली पाहिजेत आपण स्वतःच्या जीवनात व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास या दोन्ही मुळेच जीवनात यशस्वी होऊ शकतो व अपेक्षित यश मिळू शकते.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी व पालकांनी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त केले तर दादा महाराज टूपके यांनी यांनीही सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सनातन संस्कृतीचे रक्षक म्हणून आपण काम केले पाहिजेत व आपली हिंदू संस्कृती प्रमाणेच आपले आचरण झाले पाहिजे यातच आपल्या परिवाराचे व देशाचे संरक्षण होईल अश संबोधन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल संजय गायकवाड यांनी केले.तसेच कार्यक्रमाची सांगता करताना राहुल गायकवाड यांनी यापुढेही दरवर्षी असाच कार्यक्रम घेऊ असे आश्वासन दे उपस्थित विद्यार्थ्यांचे, प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे आभार व्यक्त केले.



