संगमनेर

संगमनेर शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिक आक्रमक; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

संगमनेर शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिक आक्रमक; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

 

पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिष्टमंडळाचे निवेदन

संगमनेर विजय कापसे दि १६ मे २०२५- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील तीन वर्षापासून संगमनेर नगर परिषदेवर प्रशासक असून विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अनेक नागरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी नागरिकांनी निवेदन दिले असून पंधरा दिवसात मागण्या न सोडवण्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

जाहिरात

    संगमनेर नगरपरिषद येथे मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वासराव मुर्तडक ,सोमेश्वर दिवटे ,गणेश मादास , निखिल पापडेजा , किशोर टोकसे, शैलेश कलंत्री , गजेंद्र अभंग, जीवन  पंचारिया, अभय खोजे, अरुण काका गावित्रे, मुस्ताक शेख , शेख अहमद, प्रकाश कडलक, मनोज कुमार गंगवाल, सुभाष सानप,  सुमित पवार, शशिकांत पवार, सतीश शिंदे ,सुभाष दिघे ,अंबादास आडेप, विशाल निळे ,ललित शिंदे ,सुरेश झावरे, विजय पवार,  ललित शिंदे, श्रीकांत सांगळे, संतोष मुर्तडक, अरुण हिरे  , सौरभ उमर्जी , प्रमोद  कडलग, प्रमोद गणोरे,   सुषमा भालेराव,शिवांजली गाडे,  आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकीनाला सह उपनद्या साफ कराव्यात, भुयारी गटारी योजनेचे काम तातडीने मार्गी  लावावे, शहरातील उद्याने साफ करावीत व तेथे चालणारे अवैध धंदे व गैरवापर करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, ज्या स्ट्रीट लाईट बंद असतील त्या तातडीने चालू कराव्यात, विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या व वाढीव झाडांची कटिंग करावी, ज्या कामांच्या निविदा निघून वर्क ऑर्डर दिलेले आहेत ती कामे त्वरित चालू करावी, मोडकळीस आलेल्या इमारतींना पूर्व सूचना देऊन त्या काढून घ्याव्यात, म्हाळुंगी नदीच्या पुलाला पावसाळ्या अगोदर कठडे बसवावी, शहरातील मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शहरातील सुलभ शौचालय युरिनल स्वच्छता करावी, शहरात आणि रस्त्यांना खड्डे पडले असून ते तातडीने बुजवावे. ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झाली आहे. त्या कामांची निविदा काढावी, अपूर्ण असलेली कामे परिपूर्ण करावी, जुन्या गावठाणात वापरात नसलेले लाईट पोल काढून घ्यावेत व पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

जाहिरात

      तरी नगरपालिका प्रशासनाने पुढील पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण कराव्यात ,तातडीने कार्यवाही करावी असे न झाल्यास  शहरातील नागरिकांच्या वतीने वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जाहिरात

 

अपंगांच्या निधी प्रलंबित आहे व अपंगांची संख्या वाढत चालली असून तो प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संगमनेर शहरात आपण सुंदर 40 गार्डन निर्माण केले आहेत. मात्र त्याची आता दुरावस्था झाली आहे. आणि गार्डन मधील लहान मुलांचे खेळण्याची साहित्य मोडकळीस आले आहे. संगमनेर शहराची स्वच्छता आणि सौंदर्य बिघडवण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे असे सौ दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.

 

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे