लायन्स क्लब च्या वतीने मुर्शतपूर जिल्हा परिषद शाळेत सामन्य ज्ञान स्पर्धा संपन्न
लायन्स क्लब च्या वतीने मुर्शतपूर जिल्हा परिषद शाळेत सामन्य ज्ञान स्पर्धा संपन्न
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २७ डिसेंबर २०२५– नेहमीच सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स, लिनेस व लिओ क्लब कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुर्शतपुर येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
जाहिरात
या स्पर्धेत शाळेतील एकूण १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तर १० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या सर्वांना रायटिंग पॅड स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी, स्पर्धात्मक वृत्ती तसेच आत्मविश्वास वाढीस निश्चितच चालना मिळाली. तसेच थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने १५० विद्यार्थ्यांना कानटोपीचे वाटप करण्यात आले तर शाळेमध्ये १ हजार लिटर क्षमतेच्या पिण्याची पाण्याची टाकी व टाकीपर्यंत पाण्याची पाईपलाईन करून देण्यात आली. यामुळे शाळेतील मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.जाहिरात
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब अध्यक्ष ला. अक्षय गिरमे, सेक्रेटरी ला.संदीप रशिंनकर, ट्रेझरर ला. अक्षय बोरा, लिनेस क्लब अध्यक्षा अंजली थोरें, लिनेस सेक्रेटरी सोनाली गिरमे, लिनेस सदस्य स्मिता लोढा,बलिओ क्लब अध्यक्ष लिओ धीरज कराचीवाला, लिओ सम्यक फुलफागर,लिओ मानस नांगरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य महमुणी सर, आमले ताई व धुमने ताई यांनी अथक परिश्रम घेतले.