रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी विक्रम लोढा तर सचिवपदी डॉ. राजन शेंडगे

रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी विक्रम लोढा तर सचिवपदी डॉ. राजन शेंडगे

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष विक्रम लोढा म्हणाले, “रोटरी ही समाजाच्या गरजा ओळखून लोकहिताचे उपक्रम राबविणारी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्था आहे. अशा संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याबद्दल मी सर्व सभासदांचा ऋणी आहे. या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कार्यकारिणीसह प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”

संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ निर्मूलनासाठी दिलेले जागतिक योगदान हे प्रेरणादायी असून, त्याच धर्तीवर समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आणि गरजूंपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास रोटरी सदस्य डॉ. अजय ठाकूर, रोहित वाघ, वीरेश अग्रवाल, प्रकाश जाधव, अमर नरोडे, विशाल आढाव, डॉ. दहिकर, डॉ. महेंद्र गवळी, हर्षल दोषी, इमरान सय्यद, विशाल मुंदडा, रिंकेश नरोडे, कुणाल आभाळे, सनी आव्हाड, नवनाथ सोमासे, अनुप पटेल, अनूप डागा यांच्यासह क्लबचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष डॉ. विनोद मालकर यांनी गत रोटरी वर्षात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले, तर क्लब ट्रेनर राकेश काले यांनी उपस्थितांचे आभार मानले.




