अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल मॉन्टेसरीच्या चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ संपन्न
अमृतवाहिनी निडोत चिमुकले समारंभाने आनंदीत

अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या अद्यावत इमारतीतील व्यासपीठावर हा पदवीदान समारंभ संपन्न झाला यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, प्राचार्य अंजली कन्नावर उपस्थित होत्या. या चिमुकल्यांच्या पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांची लक्षवेधी ठरलेली ड्रेपरी, त्यांनी केलेली भाषणे, सांगितलेले अनुभव आणि खेळीमेळीचे वातावरण हा सर्व पालकांसाठी एक संस्मरणीय अनुभव होता.

यावेळी बोलताना सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी हे गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र ठरले आहे. निडो इंटरनॅशनल स्कूल मधून कृतीशील शिक्षणावर भर दिला गेला आहे. हसत खेळत शिक्षण ही संकल्पना राबवली जात असून परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी काम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

तर प्राचार्य अंजली कन्नावर म्हणाल्या की, गुणवत्तेचे कृतिशील शिक्षण ही अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल ची ओळख ठरली आहे. यावेळी ओवी काटकर येणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आर्वी सानप हिने स्वागताचे भाषण केले. मॉन्टेसरी तीन च्या विद्यार्थ्यांनी गायलेले स्वागत गीत हे भावस्पर्शी होते. अत्यंत सुंदर आणि दिमाखदार झालेल्या या पदवीदान सोहळ्यानंतर मॉन्टेसरी तीनच्या विद्यार्थ्यांनी गुडबायचे गाणे गाऊन समारंभाची सांगता केली. यावेळी उपस्थित यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

राजवीर कासार यांनी आभार व्यक्त केल्यानंतर हा सोहळा उपस्थित सर्वांसाठी हृदयस्पर्शी आणि भावनिक ठरला.