तालुका कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अतुल कोताडे तर सचिव अविनाश भोसले

तालुका कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अतुल कोताडे तर सचिव अविनाश भोसले
तालुका कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अतुल कोताडे तर सचिव अविनाश भोसले

कोपरगाव विजय कापसे दि २६ डिसेंबर २०२५–कोपरगांव तालुका कला अध्यापक संघाची नुकतिच सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या उपस्थित संपन्न झाली. या मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे कला शिक्षक अतुल कोताडे यांची कोपरगाव तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली तर सचिव म्हणुन अविनाश भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच खजिनदार म्हणुन ज्ञानेश्वर परशुराम राठोड आणि उपाध्यक्ष म्हणुन मतीन मोहम्मदसाद दारूवाला आणि ज्ञानेश्वर साहेबराव पर्वत यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी कोपरगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविण निळकंठ, कोपरगांव तालुका कला शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच बहुसंख्य कला शिक्षक उपस्थित होते.या सर्वाचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.