शुक्राचार्य मंदिरात उद्या रविवारी ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन
शुक्राचार्य मंदिरात उद्या रविवारी ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २७ डिसेंबर २०२५-परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेल्या संजीवनी मंत्राचे उगम स्थान असलेले व जिथे शुभ कार्य करण्यास कोणताही मुहूर्त पहावा लागत नाही असे जगातील एकमेव शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव येथे रविवार दि २८ डिसेंबर रोजी एक दिवसीय भव्य विवाह स्पेशल अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जाहिरात
रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी होत असलेल्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन प्रसंगी मठाधिपती संत जनार्दन स्वामी आश्रमाचे परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, ओम गुरुदेव ज्ञानपीठ कोकमठाण येथील परमानंदगिरी महाराज, ज्योतिषचार्य भागवताचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, काळाराम मंदिर नाशिक येथील श्रीमंत सुधीरदास महाराज, ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार, ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर, ज्योतिषाचार्य गुरू माँ ज्योती जोशी, ज्योतिषचार्य सिद्धेश्वर मराटकर, हस्तरेषा ज्योतिषाचार्य प्रफुल्ल कुलकर्णी, ज्योतिषाचार्य अजय पाठक , अष्टक वर्ग ज्योतिषाचार्य प्रदीप पंडित, ज्योतिषाचार्य आभा करंदीकर, ज्योतिषाचार्य जितेंद्र ढांचोलिया, वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य शुभांगीनी पांगरकर, वास्तुतरना ज्योतिषाचार्य डॉ. प्रसन्न मुळे,पारंपारिक ज्योतिषाचार्य मालती शर्मा, भृगनंदी नाडी ज्योतिषाचार्य डॉ सीमा देशमुख, मिलिंद धिंगडे गुरुजी, विनोदजी वझे, प्रकाशजी जोशी, मठाधिपती कुंभारी आश्रम येथील श्री राघवेश्वरनंदगिरीजी महाराज, ज्योतिषाचार्य किरण गुजराती, टॅरो कार्ड रीडर ज्योतिषाचार्य वृंदा कोराळकर, पारंपारिक ज्योतिषाचार्य आशा नाईक, ज्योतिषाचार्य श्रीनिवास रामदास, ज्योतिषाचार्य रुईकर शास्त्री सर, लाल किताब ज्योतिषाचार्य संतोष आंबवले हे मार्गदर्शन करणार आहे तर या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेजाहिरात
अहिल्यानगर जिल्ह्याच्या किंबहुना कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या ज्योतिष अधिवेशनात सर्व सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आहे तरी जास्तीत जास्त ज्योतिष प्रेमींनी या अधिवेशनाकरिता नाव नोंदणी करावी असे आवाहन या अधिवेषनाचे आयोजक गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व नाशिक येथील ज्योतिषाचार्य मनीष गोसावी यांनी केले.