आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुल येवला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आत्मा मालिक गुरुकुल येवला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आत्मा मालिक गुरुकुल येवला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

येवला विजय कापसे दि २६ जानेवारी २०२६विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून गुरुकुलात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा  हनुमंत भोंगळे, हेमंत शाह, नेहा शाह व तुषार कापसे उपस्थित साजरा करण्यात आला.

जाहिरात

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाची शोभा वाढवली. इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी योगा डेमो सादर करून सर्वांना सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला. केजी सेक्शन मधुन इरा गायकवाड, देवांशी भुसे, श्रीजा लचके,श्रीशा आदमाने, शिवण्या भिलोरे, ओवी घाटकर,त्रिशा लुळेकर, देवश्री भावसार,स्वरा तूपसाखरे,आराध्या माळवे, श्रद्धा जगताप या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले. तसेच कृष्णाई भावसार, ऐश्वर्या आहेर,सानवी व तन्वी आसलकर, आर्या जगदाळे,आरोही कायस्थ, अक्षरा कोकणे, दिव्या आदमाने, ओवी, कार्तिकी, या विद्यार्थिनींनी देखील देशभक्तीपर नृत्य सादर केले.

जाहिरात

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी अशा विविध भाषांमधून प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण दिली. अद्विक काबरा, श्रुती महाजन, प्रणव सोंडगे,आत्मिका राऊत, वेदार्थ पटेल, सानिका पाटील, अथर्व वाघ, समर्थ हसणे,क्रियांश फेपाळे,वेदांत काळंगे, नित्या टकले, ओजस्वी माळोकर,संस्कृती जगताप,आदेश शेलार, शर्वरी पल्ले, शिव अहिरे,शौर्य कंदलकर,पार्थ रायजादे, रिषभ राजपूत,रुद्र राऊत, रोहिणी जाधव, समीक्षा जोरी, शौर्य साळवे आयमान शेख. या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषण दिली.

जाहिरात

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायन केले. तर सातवीच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत व स्वागत गीत गायले. प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे