आपला जिल्हा
सोशल मीडियावर सातत्याने वाईट लिहिणाऱ्या प्रवृत्ती विरोधात संगमनेर तालुक्यातील तरुणाई एकवटली

सोशल मीडियावर सातत्याने वाईट लिहिणाऱ्या प्रवृत्ती विरोधात संगमनेर तालुक्यातील तरुणाई एकवटली

संगमनेर विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६– नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस सह संगमनेर तालुक्यातील तरुणांनी केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली होती.







