आपला जिल्हा
नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६–नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NFWA), पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यविस्ताराचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज प्रभाकर शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली आहे.