आपला जिल्हा

अहिल्यानगर संघाला राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत ‘रौप्य’ पदक

अहिल्यानगर संघाला राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत ‘रौप्य’ पदक

पुणे, संभाजीनगर सारख्या दिग्गज संघांना नमवत अहिल्यानगरने अंतिम फेरी गाठली

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या वतीने अमरावती येथील संत गाडगेबाबा महाराज विद्यापीठात पार पडलेल्या १९ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर दिमाखात रौप्य पदक (Silver Medal) पटकावले आहे. मैदानावर दाखवलेला जबरदस्त ताळमेळ आणि अचूक रणनीतीच्या जोरावर अहिल्यानगरच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. विजयाचा धडाका: प्रतिस्पर्धी संघांचा उडवला धुव्वा!

जाहिरात

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अहिल्यानगरच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा ठरला. स्पर्धा तील अहिल्या नगरचा प्रवास पुढील प्रमाणे अंतिम फेरीत लक्षणिय ठरला.

अहिल्यानगर वि. नांदेड: ११-१ (विजेता: अहिल्यानगर)

अहिल्यानगर वि. यवतमाळ: १०-० (विजेता: अहिल्यानगर)

अहिल्यानगर वि. संभाजीनगर: १०-० (विजेता: अहिल्यानगर)

अहिल्यानगर वि. पुणे: ८-३ ने पराभूत करत अंतिम फेरीत धडक!

अंतिम सामन्यात यजमान अमरावती आणि अहिल्यानगर यांच्यात विजेतेपदासाठी अटीतटीची लढत झाली. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात अमरावती संघाने विजय मिळवला, तर अहिल्यानगरला उपविजेतेपदे ठरले.मात्र संपूर्ण स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंनी दाखवलेल्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

यांचे लाभले मार्गदर्शन अहिल्यानगर जिल्हा संघाच्या या देदीप्यमान यशामागे आशिष मेहेत्रे, उमेश वाघुलेसर ,वैष्णवी फलके,आणि सोमनाथ सपकाळ यांचे मोलाचे व तांत्रिक मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि खेळाडूंची जिद्द यामुळेच जिल्ह्याला हे यश मिळवता आले. पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधीर चापळगावकर, सचिव मकरंद कोऱ्हाळकर आणि सहसचिव कल्पेश भागवत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू आणि प्रशिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे