आपला जिल्हा

सरसेनापती बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा उत्साहाने सुरु

सरसेनापती बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा उत्साहाने सुरु
सरसेनापती बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा उत्साहाने सुरु
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ठाकरे यांचे जयंती निमिताने दरवर्षी प्रमाणे कै. दिपकअण्णा माळी यांच्या स्मरणार्थ या वर्षी देखिल सरसेनापती चषक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून याचे उदघाटन  अहिल्यानगर क्रिडा व शारिरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांच्या शुभहस्ते तर भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक कृष्णा पडांगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

जाहिरात
या वेळी खेळाडुना मार्गदर्शन करताना अरुण चंद्रे म्हणाले कोपरगांवच्या क्रिकेटला चालना देण्याचे काम या असोसिएशन ने केले या स्पर्धामुळे युवकांची  शक्ति इतर ठीकाणी व्यर्थ न जाता ही विधायक  ठीकाणी खर्च होते. आणि त्या करीता अशा स्पर्धाचे  आयोजन होणे आवश्यक आहे. या स्पर्धा भरवण्यामुळे युवकांमध्ये सकारात्मक विचार व उर्जा  तयार होण्यास मदत मिळते.त्यांनी या बद्दल कोपरगांव तालुका क्रिकेट असो.पदाधिकारी व मुंबादेवी तरुण मंडळाचे कौतुक केले.

जाहिरात
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन असो. सचिव मनोज कपोते, प्रास्ताविक अध्यक्ष  मकरंद को-हाळकर आभार खजिनदार राजेंद्र होन यांनी मानले.  या वेळी कोपरगांव तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले, आँडीटर वाकोडे, राजेंद्र माळी, सुनिल खैरे, शिवनारायण परदेशी,शिवसेना शहर प्रमुख बालाजी गोर्डे,मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल फंड, शेखर जाधव, दर्शन लाहोटी, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओम मनोज कपोते,गोपाळ वैरागळ, समर्थ दिक्षित, पृथ्वी खंडागळे आदी विशेष परीश्रम घेत आहे तसेचपंच म्हणुन खजिनदार राजेंद्र होन,सचिव मनोज कपोते,सदस्य रीजवान पठाण, पवन शिंदे, तुषार विद्धंस, दर्शन लाहोटी यांनी तर गुणलेखक म्हणुन समर्थ दिक्षित व शेखर जाधव यांनी चोख कामगिरी केली.समालोचक म्हणून मनोज कपोते, शरद होन यांनी काम पाहिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे