आपला जिल्हा

कोणतीही ठोस उपाययोजना नसलेला सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

कोणतीही ठोस उपाययोजना नसलेला सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
कोणतीही ठोस उपाययोजना नसलेला सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२६- मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटांवर उपाय करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणार आहे या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिराश करणारा असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

जाहिरात
केंद्रीय सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशामध्ये महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र हे नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिराश करणारा आहे. ठप्प वेतन वाढ, कमकुवत मागणी आणि खाजगी गुंतवणुकीतील मंदी ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी संकटे आहे असे असताना रोजगार वाढवण्यासाठी कोणताही विचार दिसत नाही. वाढत्या कर्जबोजाकडे आणि रुपयाच्या घसरनीकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.

जाहिरात

शिक्षण,आरोग्य,सामाजिक न्यायासाठी निधी कमी केला असून गोरगरिबांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद नाही. अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या व दिशाहीन सरकारचा दाखला असल्याची टीका करताना या अर्थसंकल्पातून मोठ-मोठे आकडे दाखवले गेले मात्र जनहिताचा कोणताही विचार नसून पूर्णपणे दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.

मा. आ.थोरात-आ.तांबे
नाशिक पुणे रेल्वे बाबत पूर्णपणे भ्रमनिराश

उत्तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पात मोठा अपेक्षाभंग – आमदार सत्यजित तांबे

या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, नाशिक – पुणे रेल्वे बाबत संगमनेर तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मोठी अपेक्षा होती मात्र यामध्ये या हाय स्पीड रेल्वेला पूर्णपणे दुर्लक्षित केले गेल्याने सर्व नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नसून रोजगारासाठी व शेतकऱ्यांसाठी कोणत्याही विशेष योजना राबवले नसल्याची टीका करताना देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती ही फक्त आकडेवारीतून दाखविली जाते की काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना नाशिक – पुणे रेल्वे महामार्ग साठी कोणताही निधी व तरतूद नसल्याने अपेक्षा भंग झाले असल्याची टीका त्यांनी केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे