आपला जिल्हा

कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व कायमचे हरपले -आमदार आशुतोष काळे

कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व कायमचे हरपले -आमदार आशुतोष काळे

अहिल्यानगरला सर्व पक्षीयांच्या वतीने स्व.अजितदादा पवारांना श्रद्धांजली

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६ :- स्व.अजितदादा हे केवळ राज्याचे मोठे नेते नव्हते तर ते जनतेला आपलेपणाने जपणारे आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व होते. स्व.अजितदादांच्या अकस्मात निधनाने हे नेतृत्व कायमचे हरपले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले.

जाहिरात

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांना सोमवार (दि.०२) रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, अहिल्यानगर येथे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना जिल्हा बँकेचे संचालक आमदार आशुतोष काळे बोलत होते.

जाहिरात

ते म्हणाले की, माझ्या राजकीय वाटचालीत अजितदादांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले असून कोपरगाव मतदारसंघाच्या विकासात स्व.दादांचा मोलाचा वाटा आहे. मतदारसंघासाठी कोणतेही काम असो, कुठलीही अडचण असो मी वेळी-अवेळी त्यांना भेटायला गेलो असता त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही त्यांनी नेहमीच माझ्यासाठी कोपरगावच्या विकासासाठी वेळ दिला आणि मतदार संघाच्या विकास कामांना आर्थिक बळ देवून मार्गदर्शक म्हणून नेहमीच योग्य  सल्ला दिला. ते मला नेहमी सांगत, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे काम केले तर जनता कायम आपल्या सोबत असते. दादा ज्या ज्यावेळी कोपरगावात आले त्या त्यावेळी हजारोंचा जनसमुदाय दादांच्या सभेला त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहत असे. त्यांनी दिलेले संस्कार, विचार कायम जपत त्यांची स्वप्ने, महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण करणे हीच खरी स्व.दादांना श्रद्धांजली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

जाहिरात

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, मा. खा. सुजयदादा विखे पा., मा.आ. भानुदास मुरकुटे, मा.आ. नरेंद्र घुले पा., मा.आ. बाळासाहेब मुरकुटे, मा.आ.दादाभाऊ कळमकर, मा. आ. राहुल जगताप, मा. आ. लहु कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते, भाजपा नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप मालसिंग, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी कुलगुरु निमसे, आदींसह अहिल्यानगर जिल्हा बँकेचे सर्व संचालक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने स्व.अजितदादांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करतांना आमदार आशुतोष काळे समवेत व्यासपीठावर जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.,आजी-माजी आमदार,खासदार, ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे