आपला जिल्हा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूल मध्ये रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती  प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

जाहिरात

या मध्ये विद्यार्थ्यांनी पावरी नृत्य, मल्लखांब, सीलंबम, लाठी-काठी, तसेच एरियल सिल्क मल्लखांब यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचे दमदार सादरीकरण केले. विशेषतः एरियल सिल्क मल्लखांब या थरारक क्रीडा प्रकाराने उपस्थित पालकांची मने जिंकून घेतली.तसेच यलो हाऊस, ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस व ऑरेंज हाऊस या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांमध्ये ॲथलेटिक रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये ऑरेंज हाऊस व ब्ल्यू हाऊस यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावत वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेतेपद मिळवले. विजेत्या हाऊसला प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. वर्षभरात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी आणि विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

क्रीडास्पर्धा पार पडल्यानंतर पालक भेट कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय महत्वाचा असतो. या उद्देशाने पालक भेटीचे आयोजन करण्यात आले यावेळी पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी आपल्या पाल्यांबाबतच्या अडचणी, अपेक्षा व सूचना मांडल्या. यावेळी पालकांना स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.

जाहिरात

क्रीडा दिन व पालक भेट कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी प्राचार्य नूर शेख,  सर्व क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख, हॉकी कोच रमेश पटारे, फुटबॉल कोच आढाव, क्रिकेट कोच सय्यद इसाक, एरियल सिल्क मल्लखांबच्या प्रशिक्षक कुमारी गौरी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना प्राचार्य नूर शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

          

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय महत्वाचा असतो. पालक व शिक्षक संवादामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीस निश्चित चालना मिळते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये पुस्तकी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष दिले जाते. चैतालीताई काळे.  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे