आपला जिल्हा

सकारात्मक दृष्टीकोन जीवन सुंदर बनवितो –  प्रशांत देशमुख

सकारात्मक दृष्टीकोन जीवन सुंदर बनवितो –  प्रशांत देशमुख
सकारात्मक दृष्टीकोन जीवन सुंदर बनवितो –  प्रशांत देशमुख
मा. ना श्री थोरात साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा

संगमनेर विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२६- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे महत्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे मत सुप्रसिद्ध शिव व्याख्याते  प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात
यावेळी व्यासपीठावर स.ब.वि.प्र.समाज संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे, संचालक  सीताराम पाटील वर्पे,  बी.आर.सोनवणे,  धनंजय देशमुख, प्रा.विठ्ठल शेवाळे,  नारायण उगले, अॅड.  उदय ढोमसे, प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षसमन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट, स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. जयराम डेरे, प्रशासन अधिकारी  गोरक्षनाथ पानसरे, कला मंडळ प्रमुख प्रा.नाना गुंजाळ आदी उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी बोलताना  प्रशांत देशमुख यांनी जगण सुंदर कसे होऊ शकते यासाठी शिव चरित्रातील काही दाखल्यांच्या माध्यमातून तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड व ताराबाई शिंदे यांच्या जीवन प्रवासातील काही उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. महाविद्यालयीन जीवनात ऐकलेले विचार जीवनाला उभारी देत असतात. आपली आवड आणि आपल प्रोफेशन एकच झाल तर आपण आत्मा ओतून काम करतो त्यातून जीवन सुंदर होते. आपल्याकडे गुणवत्ता आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन, श्रद्धा आणि हजरजबाबीपणा आपल आयुष्य सुंदर बनवितो. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी एकदा तरी रायगड किल्ल्याला भेट द्यावी तसेच शिव चरित्र समजून घ्यावे व आचरणात आणावे असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

या प्रसंगी बोलताना डॉ.तांबे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदना कमी होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्येप्रचंड उर्जा असते. विद्यार्थ्यांमध्येइतिहास समजावून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी क्रियाशील आणि विचारशील असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कला, सांस्कृतिक व क्रीडा या गुणांचा सुद्धा विकास होणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेंद्र जोरवर यांनी करून दिला. वार्षिक अहवाल वाचन प्रा.जयराम डेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कोमल म्हस्के, डॉ.स्वाती ठुबे यांनी केले तर प्रा.नाना गुंजाळ यांनी आभार मानले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व समिती प्रमुख व सदस्य, प्राध्यापक, प्रशासन अधिकारी व शिक्षकेतर सेवक वृंद, सह्यतरंग टीम तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांची प्रचंड उपस्थिती होती.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे