आपला जिल्हा

बिझनेस एक्सपो मध्ये शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

बिझनेस एक्सपो मध्ये शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
बिझनेस एक्सपो मध्ये शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

लायन्स

कोपरगाव विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६लायन्स,लिनेस, लिओ क्लब कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव प्रायोजित कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, प्रायोजित संजीवनी ग्रुप ऑफ व सम्राट ग्रुप प्रायोजक असलेले तसेच गोदावरी दूध व समता पतसंस्था सहप्रयोजक असलेले सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन मध्ये भव्य एक्स्पो २०२६ चे आयोजन गुरुवार दि १२ फेब्रुवारी ते सोमवार दि १६ फेब्रुवारी दरम्यान केले आहे.

जाहिरात
 या एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने शनिवार दि १४ फेब्रुवारी रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. एम.एस.सी.आय.टी कॉम्प्युटर सेंटर, साई सिटी कोपरगाव प्रायोजक असलेल्या या चित्रकला स्पर्धेत इयत्ता ५ ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत गावची जत्रा, विविधतेतील एकता व भारतीय संस्कृतीचा वारसा यावर आधारित चित्र रेखाटायचे असून शनिवार दि १४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे तर सहभागी विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी २ तासाची वेळ असणार आहे यात सहभागी सर्व विद्यार्थी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे तर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांस १ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकास ७०१ रुपये तर  तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांस ५०१ रुपयांचे रोख स्वरूपात बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.तर या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे व नगरसेविका गौरी पहाडे उपस्थित असणार आहे.
तर संध्याकाळी ६ वाजता सम्राट वर्मा ग्रुप प्रायोजित डान्स कोपरगाव डान्स ही ग्रुप डान्सची स्पर्धा होणार आहे. याप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकदादा काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, क्रेडाईचे राज्य सचिव आशिष पोखरणा, समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या, कॉलेजन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग ट्रस्टी हिमांशी वर्मा आदी उपस्थित राहणार आहे.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे