आपला जिल्हा

कोपरगाव शहरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना नव्याने गती,नगराध्यक्ष नगरसेवकांनी केली पाहणी

कोपरगाव शहरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना नव्याने गती,नगराध्यक्ष नगरसेवकांनी केली पाहणी
विकासाचा वेग वाढवत दर्जा टिकवण्यावर भर – पराग संधान
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६-कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डॉक्टर जवेरी हॉस्पिटल ते नरोडे यांच्या घरापर्यंत (इंदिरापथ) या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची नव्याने सुरुवात करून नगराध्यक्ष पराग संधान यांनी सहकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. ही कामे सुरू करण्यापूर्वी त्या कामांची गुणवत्ता आणि दर्जा टिकून राहण्यासाठी आवश्यक त्या सूचना करून कामे दर्जेदार व्हावी यासाठी भूमिका घेत प्रलंबित रखडलेल्या कामाची गती वाढवली आणि झंजावात सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

जाहिरात
अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. खड्डे, धूळ आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाला याचा विशेष त्रास होत होता.

जाहिरात
या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता, डांबराची जाडी, पाणी निचऱ्याची व्यवस्था तसेच कामाचा वेग यांची नगराध्यक्ष पराग संधान सखोल पाहणी केली. काम दर्जेदार व टिकाऊ व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांत कोणतीही तडजोड होणार नाही, याची स्पष्ट भूमिका यावेळी व्यक्त केली.

जाहिरात
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल तसेच नागरिकांची गैरसोय दूर होऊन सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक रवी कथले, नगरसेविका विजयाताई देवकर, कालू आप्पा आव्हाड, विनोद राक्षे, संदीप देवकर, मुख्याधिकारी सुहास जगताप साहेब, बांधकाम अधिकारी मोटे साहेब, निलेश बंब, माहूरकर सर, माजी नगरसेवक संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे