संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये डिपेक्स स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये डिपेक्स स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
विद्यार्थ्यांच्या नवोन्मेष कल्पनांना संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये व्यासपीठ

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६–आखिल भारतीय विद्यार्थी परीषद प्रायोजीत व संजीवनी युनिव्हर्सिटी आयोजीत ‘डिपेक्स’ या विध्यार्थ्यांच्या नवोन्मेष कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून नुकतेच तांत्रिक प्रकल्पांचे प्रदर्षनाचे उद्घाटन संपन्न झाले. डिपेक्स या तांत्रिक प्रदर्शनाची सुरुवात १९८६ साली वालचंद इंजिनीअरिंग कॉलेज येथून अवघ्या १६ प्रोजेक्ट्सच्या प्रदर्शनाने झाली होती. आज ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील तब्बल १३ केंद्रांवर विस्तारली असून सुमारे ६५०० प्रकल्पांच्या सहभागातून तिचा व्याप लक्षणीय वाढला आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध तांत्रिक संस्थांमधील सुमारे ४०० पोजेक्टस सह १७०० स्पर्धकांनी संजीवनी युनिव्हर्सिटी आयोजीत स्पर्धेत सहभाग नोंदविला.

संजीवनी युनिव्हर्सिटी आयोजीत डिपेक्स या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री साईटेक इंजिनीअरिंग एल एल पीचे डायरेक्टर व संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकचे माजी विद्यार्थी सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रसिडेंट अमित कोल्हे यांनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्हाईस चांसलर डाॅ. ए.जी.ठाकुर, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते, आखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे पदाधिकारी देवेंद्र देशमुख, श्रावणी बचाल, आयुश पारीख, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संजीवनी विद्यापीठाच्या विविध उल्लेखनीय उपलब्धींबाबत बोलताना डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, संजिवनी विद्यापीठाने टेडएक्स सारख्या जागतिक व्यासपीठांतर्गत विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या मान्यवरांना एकत्र आणून त्यांच्या अनुभव कथनाचा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला होता. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार केले असून जागतिक दर्जाचे शिक्षण व संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्पर्धेतील अपयशामुळे खचून न जाता त्यातून शिकवण घेत पुढील वाटचाल अधिक जिद्दीने करावी, असा मोलाचा संदेश त्यांनीविध्यार्थ्यांना दिला. संजीवनीच्या यशस्वी वाटचालीसाठी अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी नमुद केले.
संजीवनी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे हे नेहमी सांगायचे की, विद्यार्थ्यांचे खरे ज्ञान केवळ पुस्तकातून नव्हे तर त्यांच्या प्रोजेक्टमधून दिसून येते. त्यांची हीच दूरदृष्टी आज संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये प्रात्यक्षिक आधारित मूल्यांकनाच्या रूपाने पुढे नेली जात आहे. विद्यापीठात विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, संशोधन आणि नवकल्पनांद्वारे आपली क्षमता सिद्ध करण्यास प्रोत्साहन दिले जाते. प्रोजेक्टला दिलेले हे महत्त्व विध्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि कौशल्यविकासाला नवे आयाम देते. अशा प्रदर्शनांमधून देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली नवसंशोधनाची ऊर्जा निर्माण होते. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ च्या व्हिजनला साकार करण्यासाठी अशा उपक्रमांमुळे निश्चितच बळकटी मिळेल. आज श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्याच्या जोरावर जागतिक स्तरावर भारताने नेतृत्व सक्षमपणे करावे, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थांनी नेहमी प्रोजेक्ट केंद्रित शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे– अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी.
स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजीच्या डीन डाॅ. पी. कविथा राणी, प्रोजेक्ट डायरेक्टर डाॅ. किरण वाकचौरे व प्रा. चैतन्य काळे यांनी या स्पर्धांचे समन्वयक म्हणुन काम पाहिले तर या प्रसंगी देवेंद्र देशमुख यांनी आभार मानले.



