आपला जिल्हा

पेशवे राघोबादादा वाडा येथे ‘हेरीटेज वॉक’ उपक्रम 

पेशवे राघोबादादा वाडा येथे ‘हेरीटेज वॉक’ उपक्रम 

पेशवे राघोबादादा वाडा येथे ‘हेरीटेज वॉक’ उपक्रम

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२६-विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील इतिहास न वाचता तो प्रत्यक्ष अनुभवणे  गरजेचे आहे. हेरीटेज वॉक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल कुतुहूल व जाणीव निर्माण होते. स्थानिक इतिहास जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन के.जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. 

जाहिरात

             के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने कोपरगाव शहरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या ‘पेशवे राघोबादादा वाडा’ येथे (दि. १६/०२/२०२६) ‘हेरीटेज वॉक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत सोमैया महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पेशवे राघोबादादा वाडा येथे भेट देत इतिहासाचा साक्षात अनुभव घेतला. स्थानिक ऐतिहासिक वारशाची जपवणूक आणि जनजागृती हा या उपक्रमाचा हेतू होता.

जाहिरात

           याप्रसंगी अधिक माहिती देतांना इतिहास विभाग प्रमुख डॉ.दिलीप बागुल म्हणाले की, “पेशवे काळात या राघोबा दादा वाड्याचे महत्व होते. मराठा सत्तेचा अटकेपार झेंडा लावणारे तसेच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेले राघोबा दादा पेशवे यांचे  या वाड्यामध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते. या वाड्याचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम व रचना वाडा बघितल्यावर लक्षात येते. त्यामुळे राघोबा दादा वाड्याचे मराठ्यांच्या इतिहासाबरोबरच कोपरगावच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.” या हेरीटेज वॉक दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत या ऐतिहासिक वारशाबद्दल आपले कुतुहूल व्यक्त केले.

         यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ दिलीप बागुल, मराठी विभाग प्रमुख प्रा संपत आहेर, प्रा प्रवीण मोरे, प्रा अमोल बंद्रे  तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.         

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे