आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी

कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी

कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजाहितदक्ष राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे यांनी सांगितले की, शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता त्यामुळे रयतेचं राज्य हि संकल्पना खरी त्यांच्या काळात पहावयास मिळाली. त्यांच्या राज्यात जनतेमध्ये निर्भयता होती आणि जाती धर्माचा कुठलाही भेदभाव नव्हता.त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून शौर्य, न्याय, कर्तव्यदक्षता आणि लोककल्याण यांचे आदर्श घालून दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करतांना शौर्याबरोबरच सुशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांनी रयतेच्या हिताला प्राधान्य देत न्याय, पारदर्शकता आणि संघटनशक्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळातही महाराजांचे विचार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही विविध क्षेत्रांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून आपल्याला व्यवस्थापन, नेतृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे