आपला जिल्हा

संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर सुवर्णभरारी

संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर सुवर्णभरारी


            अॅथलेटिक्समध्ये अभिषेक निकम व ओंकार दोंड  यांची सुवर्ण पदकांची कमाई

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२६-संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी अभिषेक शिवाजी निकम  आणि ओंकार गोरक्ष दोंड यांनी राष्ट्रीय पातळीवरील अॅथेलॅटीक्स स्पर्धेत अनुक्रमे भाला फेक आणि गोळा फेक या क्रिडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले . या दैदीप्यमान यशानंतर संजीवनी ग्रुप ऑफ स्कुलच्या संचालीका डॉ.मनाली कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  

जाहिरात

    हे दोघेही इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहेत. ही राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा गोव्यातील पेडेम स्पोर्ट्स  कॉम्प्लेक्स मध्ये संपन्न झाली.राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संजीवनीचे खेळाडू नेहमीच विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत  आपल्या कौशल्याची आणि जिद्दीची प्रचिती देत असतात. नियमित  सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेने दिलेल्या उत्तम क्रीडा सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले. या यशामुळे संजीवनी अकॅडमीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी ठरले आहे.

जाहिरात

     या दोघा सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवान, तांत्रिकदृष्ट्याा सक्षम आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ही कामगीरी केली. संजिवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस्चे अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे व  मॅनेजिंग ट्रस्टी   अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  या खेळाडूंना प्राचार्या अनुश्रीता सिंह , हेड मिस्ट्रेस अपर्णा फडणीस, प्रशिक्षक राहुल सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन  लाभले. या यशामुळे संजीवनी अकॅडमीतील विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील क्रिडाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे