आपला जिल्हा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२६सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह शनिवारी साजरा करण्यांत आला. अध्यक्षस्थानी संचालक निवृत्ती बनकर होते.

जाहिरात
          प्रारंभी कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. कार्यकारी संचालक श्री. सुहास यादव यांनी सुरक्षा ध्वज फडकवत उपस्थित कामगारांना सुरक्षेची शपथ दिली. ते पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत कारखाना अंतर्गत उत्पादन, रासायनिक उपपदार्थ निर्माती, सहवीज, बायोगॅस, इथेनॉल, अग्नीशमन आदि विभागासाठी दर्जेदार आधुनिक सुरक्षा उपकरणे घेवुन प्रशिक्षीत मनुष्यबळाच्या माध्यमांतुन कारखाना अंतर्गत निर्माण होणारे संभाव्य अपघात टाळले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह देशभरात ४ ते १० मार्च दरम्यान साजरा करून मानव निर्मित होणारे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन केले जाते. कारखाना कार्यक्षेत्रातील आसपासच्या गावातुन मोटारसायकलद्वारे कामावर येणा-या कामगारांना युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी मोफत सुरक्षा हेल्मेट दिले आहेत त्याचा सर्वांनी वापर करावा. कामाच्या ठिकाणी प्रत्येकांने सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून घरी वाट पाहणारेही काळजीत पडणार नाही. कामगार हा घटक उत्पादन विभागाची राष्ट्रीय संपत्ती आहे.

जाहिरात
         व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह का साजरा केला जातो याची माहिती देवुन गेल्या वर्षभरात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत दैनंदिन अपघात टाळण्यासाठी ज्या कामगारांनी सहकार्य केले त्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तुचे वितरण करण्यांत आले. सुरक्षा उपकरणासह काळजीवाहक संदेश फलकाचे प्रदर्शन कार्यस्थळी मांडण्यांत आले होते.

जाहिरात
           याप्रसंगी संचालक सर्वश्री, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी केले तर संदिप गवळी यांनी आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे