आपला जिल्हा

कोकमठाण येथे समाधान शिबिराचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन

कोकमठाण येथे समाधान शिबिराचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन

कोकमठाण येथे समाधान शिबिराचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२६महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनहितकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ कोकमठाण येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वा.  आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडले. यावेळी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांच्या सह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत कोकमठाण मंडळातील नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी एक दिवशीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये नागरिकांची प्रशासकीय प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येणार आहे. यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन थेट जनतेच्या दारापर्यंत आले आहे. यामुळे नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे.

जाहिरात

प्रशासनाने अधिक सक्रिय होऊन लोकांची कामे वेळेत पूर्ण करावीत. शासन आणि प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनतेची कोणत्याही कारणास्तव अडवणूक नाही झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी आदरपूर्ण वागावे कारण आपण लोकहितार्थ पदावर काम करीत आहे याची जाणीव ठेवायला हवी. सामान्य नागरिकांना कोणत्याही कारणास्तव त्रास व्हायला नको आणि जर त्रास होत असेल तर उच्च अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे. वेळप्रसंगी कुणाशी वाईट पणा घ्यायची वेळ आली तर तो घेतला पाहिजे पण सामन्यांची कामे मार्गी लागायला हवी. नागरिकांच्या कामाला विलंब करणे किंवा जाणून बुजून कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची तक्रार संबंधित मंत्री महोदयांकडे करण्यात येईल. अशा सूचना यावेळी आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात

यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले आणि डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जमिनीचे उतारे यांचा समावेश होता. शासकीय योजनांचा लाभ थेट हातात मिळाल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशआबा परजणे, राजधरजी महाराज महानुभाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, गोरक्षनाथ रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती  गोवर्धन परजणे, गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन विजय रक्ताटे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक  विजयराव थोरात, कोकमठाण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब लोहकणे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे माजी संचालक सुदामराव लोंढे, कोकमठाण महसूल मंडळातील कोकमठाण, संवत्सर, वारी, सडे, कान्हेगाव येथील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन,  संचालक, लाभार्थी, महानुभाव आश्रमातील माताजी,   लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे