आपला जिल्हा

एकविराच्या शिबिरात १४३ महिलांची कॅन्सर तपासणी

एकविराच्या शिबिरात १४३ महिलांची कॅन्सर तपासणी
एकविरा क्रीडा महोत्सवात मोफत कॅन्सर तपासणी
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १४ मार्च २०२६-धावपळीचे जीवन, वाढलेला तणाव आणि असंतुलित आहार यांसह विविध कारणांमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण हे दुर्दैवी झाले आहे. याबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी याकरता  मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आज झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 143 महिलांनी आपली तपासणी करून घेतली.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. अश्विनी देशमुख इंडियन कॅन्सर सोसायटीचे किशोर साळुंखे डॉ. भाग्यश्री भुतकर, डॉ. सायली भेलसेकर, डॉ मानसी जोगळेकर ,डॉ मंदिप चड्डा ,अविनाश आव्हाड . सोमनाथ गुंजाळ, सुविधा आरसिद्ध, डॉ. नितीन भांड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात 111 महिला व 32 पुरुषांनी आपली तपासणी केली.

जाहिरात

या तपासणीमध्ये महिलांची एचपीव्हीडीएनए, व्हीआयए, बेस्ट चेकअप, ओरल क्लिनिकल चेकअप, बीपी शुगर यांसह सुमारे दहा हजार रुपयांच्या विविध मोफत तपासण्या करण्यात आल्या.

दिवसभरात संगमनेर शहर व तालुक्यातील अनेक महिलांनी या मोफत शिबिरातून आपल्या तपासणी केल्या. ग्रामीण भागातील महिलांची मोठी उपस्थिती होती.

जाहिरात

यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रीडा महोत्सव होत आहे यामध्ये यावर्षी सुमारे 5000 महिलांचा सहभाग राहिला असून या सात दिवसाच्या क्रीडा महोत्सवाच्या काळात नेत्र तपासणी बरोबर आरोग्य तपासणी ही करण्यात आली आहे. याचबरोबर एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या सहकार्याने संगमनेर मध्ये मोफत कॅन्सर तपासणी झाली.

 सध्या सर्वांचे धावपळीचे जीवन झाले आहे .वाढता तणाव, असंतुलित आहार, व्यस्त जीवन शैली  या विविध कारणांमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आहे .पहिल्या व दुसऱ्या स्टेजला कॅन्सरचे लक्षणे लवकर लक्षात येत नाही. पण जर वेळोवेळी तपासणी केली तर कॅन्सर अगदी पूर्ण बरा करता येतो म्हणून प्रत्येकाने कॅन्सरची पूर्व तपासणी करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर कॅन्सरला घाबरून जाऊ नका कारण त्यावर मात करता येते  असे त्या म्हणाल्या.

तर सौ मीराताई शेटे म्हणाल्या की डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांकरता या मोफत तपासणी शिबिरामुळे अनेक महिलांच्या आरोग्याबाबत महिला सतर्क झाल्या आहेत. महिला सक्षम तर कुटुंब सक्षम. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून एकविराच्या वतीने आरोग्याबाबत केली जाणारी जनजागृती अत्यंत कौतुकास्पद यापुढील काळात आणखी महिला या शिबिरात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

यावेळी विविध महिला व डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केली .सकाळी दहा ते दोन या वेळेत स्वतंत्र विभाग करून महिलांची मोफत तपासणी करण्यात आली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे