साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि १५ मार्च २०२६–कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शासनमान्य ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कासली येथील साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी १४ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.परशराम सांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धारणगावकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा जनार्दन सुपेकर, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नितीन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक महिला उपस्थित होत्या.
या प्रसंगी आयोजित स्नेहसंमेलनात शाळेतील आरवी भाऊसाहेब मलिक , आरवी सागर मलिक, शिवांश चांगदेव मलिक, देवांश प्रसाद मलिक, भूषण योगेश मलिक, विधी अविनाश मलिक, अद्विका संदीप मलिक,
स्वरूप मोहन सुंबे, कविष योगेश शिंदे, आराध्या गोविंद शिंदे, प्रणवी योगेश पाठक, धनश्री रामनाथ पगार, सर्वेश्वरी अमोल शिंदे, विश्व सुभाष शिंदे, ध्रुव नितीन शिंदे, प्रियांशी नारायण तिपायले, कृष्णा ऋषीकेश शिंदे,
पूर्वी नितीन शिंदे, आयुष योगेश पाठक, आदित्य अमोल भालेराव, राघव राहुल शिंदे, शिवण्या अरुण वाघमारे, शिवण्या राहुल शिंदे, शिवंश गणेश शिंदे, शिवंश सुनील मलिक, प्रणव भीमा ढेपले आदी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर हिंदी मराठी इंग्रजी गाण्यावर आपले नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर वार्षिक क्रीडा महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर उपस्थित पालकांचे व कार्यक्रम उत्कृष्ट आयोजित केल्याबद्दल शालेय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास चव्हाण,सुशांत साबळे, सोनाली कापसे, अलका जाधव,आयुब शेख आदींनी अथक परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक विलास चव्हाण व उपस्थितांचे आभार सोनाली कापसे यांनी व्यक्त केले.




