आमदार आशुतोष काळे यांचे बेगडी वर्तन; सवंग लोकप्रियतेसाठी व्हिडिओ स्टंट : सलीम पठाण यांची टीका
आमदार आशुतोष काळे यांचे बेगडी वर्तन; सवंग लोकप्रियतेसाठी व्हिडिओ स्टंट : सलीम पठाण यांची टीका
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १६ मार्च २०२६– मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असताना ईदगाह मैदानासह शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने नियमितपणे करण्यात येत आहे. बडी रातच्या दिवशीही मुस्लिम समाजाच्या दोनही क्रबस्थांनाची स्वच्छता पालिका प्रशासनाने केली होती. मात्र या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी केलेला प्रसिद्धीचा व्हिडिओ स्टंट अत्यंत हास्यास्पद व दिशाभूल करणारा असल्याची टीका सलीम पठाण (एस.पी.) यांनी केली आहे.
जाहिरात
याबाबत बोलताना पठाण म्हणाले की, धार्मिक भावना आणि सामाजिक सलोखा यांचा विचार न करता केवळ प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसिद्ध करणे हे लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. प्रत्यक्षात नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असताना त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.जाहिरात
पठाण यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, मुस्लिम समाजाशी संबंधित गंभीर घटना घडल्या त्या वेळी आमदार काळे कुठे होते? मुस्लिम धर्मग्रंथाची विटंबना झाल्याची घटना असो, मुस्लिम धर्मगुरूंवर झालेली मारहाण असो किंवा मुस्लिम युवतीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण असो अशा अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी कधीही ठाम भूमिका घेतलेली दिसून आली नाही. समाजाच्या न्यायासाठी आवाज उठविण्याची वेळ येते तेव्हा मौन धारण करणारे आणि फक्त प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे स्टंट करणारे हे वर्तन दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.जाहिरात
कोपरगाव शहरात सर्व समाजांच्या भावना जपून प्रशासनाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. त्यामुळे धार्मिक विषयांवर अनावश्यक प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न न करता जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ स्टंट करण्याऐवजी प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही सलीम पठाण यांनी शेवटी नमूद केले.सलीम पठाण
आपल्या कारकिर्दीत कधी महापुरुषांचे पुतळे स्वच्छ केले नाही,कधी ईदगाह मैदान स्वच्छ करण्याचे सुचले नाही मात्र नगरपरिषदा कामकाज करते आहे त्यामुळे आमदार काळे यांना नेहमीच्या सवई प्रमाणे श्रेय घेण्यासाठी प्रसिद्धीचे स्टंट करण्याची गरज भासत आहे.