४८ घरकुल लाभार्थी पत्र वाटप,लवकरच १०० लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जाणार – नगराध्यक्ष संधान
प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १६ मार्च २०२६–प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कागदपत्रे पूर्तता करण्यावेळी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास लाभार्थ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासनाशी संपर्क साधावा.प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या योजनेमुळे कोपरगाव शहरातील अनेक गरजवंत कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले आहे. पुढील टप्प्यातही कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सुमारे 100 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.
जाहिरात
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून 48 पात्र लाभार्थ्यांना सोमवार (दि.16) मार्च 2026 रोजी घरकुल मंजुरी पत्रांचे नगरपालिका सभागृहात वितरण करण्यात आले.कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
जाहिरात
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घर बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये आणि राज्य शासनाकडून एक लाख रुपये असा निधी प्रत्येक लाभार्थ्यास मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नगरपालिका प्रशासन लाभार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करणार आहे. निधी मिळविताना अडचणी टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी नॅशनलाइज बँकेत नवीन खाते उघडावे, कोपरगाव नगरपालिका प्रशासन लाभार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असून काही मदतीची गरज भासल्यास नगरपालिकेत संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
जाहिरात
यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत आत्तापर्यंत 310 घरकुलांचे वाटप पूर्ण झाले असून ती घरे पूर्णत्वासही गेली आहेत. पुढील काळात मंजूर घरकुलांचे डीपीआर पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, बीएलसी पद्धतीनुसार लाभार्थ्यांनी स्वतःचे घर बांधायचे असून बांधकामाच्या टप्प्यानुसार केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी अडीच लाख रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. निधी खात्यात जमा झाल्यानंतर तो तात्काळ घराच्या बांधकामासाठी वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.कोपरगाव नगरपरिषदेचे उद्दिष्ट प्रत्येक पात्र कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हे असून ज्या पद्धतीने 310 घरकुलांचे डीपीआर पूर्ण झाले, त्याचप्रमाणे उर्वरित घरकुलांचे डीपीआरही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास लाभार्थ्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप,उपमुख्याधिकारी पापडीवाल साहेब, बांधकाम सभापती निलोफरताई पठाण,महिला बालकल्याण समिती सभापती सविताताई मंजुळ,आरोग्य सभापती वैभव आढाव,गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक अतुलशेठ काले,संतोष शिंदे, अनिल आव्हाड,संजय उदावंत,फिरोज पठाण,पी एम ए वाय योजनेचे अधिकारी हर्षवर्धन सुराळकर, विशाल वर्हे व न .पा.अधिकारी व कर्मचारी वृंद हजर होते.