आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यातील ग्रामसेवकांला मारहाण, गुन्हेगारांना अटक करत गुन्हे दाखल करण्याची मागणी

कोपरगाव तालुक्यातील ग्रामसेवकांला मारहाण, गुन्हेगारांना अटक करत गुन्हे दाखल करण्याची मागणी

कोकमठाण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रासेवकास गावातील एका कुटूंबाने केली मारहाण

जाहिरात

कोपरगाव विजय कपसे दि १७ ऑक्टोबर २०२४कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांना गावातील चार पाच लोकांनी शुल्लक कारणावरून जबरी मारहाण करत जखमी केले असून या मारहाण करणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच कोपरगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन पाठवत केली आहे.

जाहिरात

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवार दि १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास संघटनेची सभासद तालुक्यातील कोकमठाण येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर देवराम सुर्वे हे आपल्या कार्यालयात कामकाज करत असताना गावातील चार-पाच लोकांनी आत घुसून तात्काळ वारस नोंद करावी असा आग्रह सदर ग्रामसेवकाकडे धरला असता ग्रामसेवक सुर्वे यांनी सदर वारस नोंदीच्या अनुषंगाने त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व विविध कार्यपद्धती सांगितली परंतु त्या लोकांचे यावर समाधान न झाल्याने गोष्ट हमरी तुम्हरी वर येऊन त्या लोकांनी ग्रामसेवक सुर्वे यांना मारहाण केली असून सदर ग्रामसेवक कोपरगाव येथील एसजेएस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

जाहिरात

त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने सदर गावच्या ग्रामसेवकास मारहाण करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या लोकांना अटक करत त्यांच्यावर भा.द. वि. स कलम १०९ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,१३२ सरकारी कामात अडथळा आणणे, ११८(१) इच्छापूर्वक दुखापत करणे, ३५२ शिवीगाळ करणे, ३५१ (२) (३) कलम ३२६ जीवे ठार मारण्याची धमकी आदी कलमातर्गत गुन्हे दाखल करावे तसेच ज्ञानेश्वर सुर्वे यांच्याकडे असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायतीचा कारभार काढून घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत व जिल्हा सचिव शशिकांत नरोडे यांनी निवेदन पाठवत केली आहे.

काल्पनिक चित्र

या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांनी आज गुरुवार दि १७ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुका पंचायत समिती समोर ठिया आंदोलन करत निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे