आपला जिल्हा

के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन

के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन

के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १ एप्रिल २०२६-जिल्ह्यातील अग्रगण्य व महाराष्ट्र शासनाच्या मूल्यांकनात अ+ हे सर्वोच्च मानांकन मिळवलेल्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क ब्रिज कोर्सचे आयोजन दि. ०१ एप्रिल २०२६ सकाळी ०९:०० वाजे पासून करण्यात येत आहे. या निमित्ताने तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे.

जाहिरात

             अकरावी व बारावी हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष असतात. अकरावीची प्रवेश प्रक्रिया, दोन्ही वर्षात असणारे अभ्यासक्रम, या काळात येणाऱ्या संधी , विविध प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांची यथायोग्य माहिती विद्यार्थ्यांना असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून प्रवेशाआधीच याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या पुढील अडचणी दूर होतात तसेच भविष्यातील धावपळ व चिंताही दूर होते. त्यामुळे अपेक्षित ध्येयनिश्चिती होते व शैक्षणिक प्रवास सुकर होतो. यासाठी हा कोर्स अत्यंत  महत्त्वाचा आहे.

जाहिरात

            महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या या कोर्समध्ये अकरावी व बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे. तसेच विज्ञान शाखेतील JEE, NEET, MHT-CET, CLAT इत्यादी परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे CA, CS, PO तसेच पोलीस भरती ग्रामसेवक, तलाठी MPSC व UPSC या स्पर्धा परीक्षांबाबतही महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच या परीक्षांची पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे.

जाहिरात

            विशेष म्हणजे  हा कोर्स पूर्णपणे निःशुल्क असल्याने व जागा मर्यादित असल्याने ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या कोर्ससाठी नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे व उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :

    9822328814                                    7020663559                                          9850929303

(श्रीमती सुनिता बालवे)                          (श्री अभिजीत वाघ )                              (डॉ. दीपक बुधवंत)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे