आपला जिल्हा

महाराष्ट्र – पंजाब मध्ये दूध उत्पादन सामंजस्य करार; दूध उत्पादनाचा संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरणार

महाराष्ट्र – पंजाब मध्ये दूध उत्पादन सामंजस्य करार; दूध उत्पादनाचा संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरणार
महाराष्ट्र – पंजाब मध्ये दूध उत्पादन सामंजस्य करार; दूध उत्पादनाचा संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरणार
जाहिरात

Sangmner vijay kapse दि १ एप्रिल २०२६महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असून दुधामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. या व्यवसायात अधिक संशोधन कमी गाईंमध्ये,जास्त दूध उत्पादन याचबरोबर नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यांमधील प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

जाहिरात
वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या तालुक्यातील 1500 युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत हा सामंजस्य करार महाराष्ट्राचे मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांच्यामध्ये स्वाक्षरी करार झाला.

जाहिरात

याप्रसंगी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात,पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, दूध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ.समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे,नवनाथ आरगडे, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, विक्रम राजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कु-हाडे,विष्णू ढोले ,तुकाराम दातीर, रवींद्र रोहम,डॉ.प्रमोद पावसे, भारत मुंगसे, सौ.प्रतिभा सोमनाथ जोंधळे, सौ.मंदा गोरख नवले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, विनोद हासे यांच्यासह विविध व्हेटर्नरी डॉक्टर त्याचप्रमाणे तालुक्यातील युवक दूध उत्पादक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर राजहंस दूध संघासह संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सहकारी संस्था राज्याला दिशादर्शक ठरल्या आहे. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दररोज सुमारे चार लाख लिटर दूध संकलन होत असून तालुक्यातून नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे .यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या व्यवसायात रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वात तालुक्यात एमडीएफ गोठा मुरघास या संकल्पना राबवल्या गेल्या.

यापुढील काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन यासाठी मिशन 50 लिटर अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत 50 लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर पंजाब राज्याने दुग्ध क्षेत्रामध्ये केलेली क्रांती ही दिशादर्शक असून पंजाब आणि महाराष्ट्रात विविध संशोधन, दूध व्यवसायातील कल्पना, माहितीची देवाण – घेवाण, गाईचे आरोग्य व आहार याबाबत अधिक समन्वय राहावा याकरता महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून पंजाब बरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पंजाब मध्ये होणाऱ्या नवनवीन प्रयोगांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना पंजाब मधील शेतकऱ्यांच्या गाई गोठ्यांवर जाऊन तेथील कामाची पाहणी करता येणार आहे. याचबरोबर पंजाबच्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दूध व्यवसायाने ग्रामीण भागामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. आपल्या सहकारी संस्थांनी कायम शेतकरी व उत्पादकांना चांगला भाव दिला आहे पुढील काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध ही संकल्प राबवण्यासाठी काम होणे गरजेचे आहे म्हणून मिशन 50 लिटर ही मोहीम म्हणून राबवा.

तर रणजितसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन 50 लिटर अंतर्गत 25 व्हेटर्नरी डॉक्टर यांना प्रत्येकी दहा शेतकऱ्यांच्या 10 गाईंची जबाबदारी देण्यात आली आहे. या अंतर्गत 250 गाईंचे आरोग्य आहार देखभाल केली जात आहे. यामधून पुढील दोन वर्षांमध्ये 50 लिटर क्षमतेच्या गाई निर्माण होतील आणि आपला तालुक्यातील शेतकरीही सात वर्षांमध्ये 50 लिटर क्षमतेच्या गाई निर्माण करील यासाठी काम सुरू आहे.

तर पंजाबचे दलजीत सिंह म्हणाले की, संगमनेर तालुक्याने राज्याला दिशा दिली आहे. मिशन 50 लिटर या उपक्रमातून दूध उत्पादन वाढीमध्ये दुसरी क्रांती होणार असून संगमनेरचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र व पंजाब यांच्या वतीने सामंजस्य करारावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे