आपला जिल्हा
कोपरगावात एकदिवशीय फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन-गणेश वाणी

कोपरगावात एकदिवशीय फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन-गणेश वाणी
कोपरगावात एकदिवशीय फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन-गणेश वाणी
Kopargaon vijay kapse दि २८ मार्च २०२६- अहिल्यानगर जिल्हा व कोपरगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या औषध माहिती केंद्राद्वारे तयार केलेले एक दिवशीय कार्यशाळा फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी दिली आहे. 

रविवार दिनांक २९ मार्च रोजी कोपरगाव तालुका केमिस्ट भावनात आयोजित केलेल्या या एकदिवशीय कार्यशाळेचा प्रारंभ ठीक सकाळी ९ वाजेपासून होणार आहे तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा सुरू असणार आहे तरी तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




