आपला जिल्हा

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

Kopargaon vijay kapse दि २८ मार्च २०२६सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय सप्तशृंगी माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिंगणापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र शिंगणापूर ते वणी सप्तशृंगी गड भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने दिली आहे.
 सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दि २८ मार्च रोजी या भव्य पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन संध्याकाळचा मुक्काम येवला येथे  २९ मार्च २०२६ चा मुक्काम वळदगाव येथे ३० मार्च २०२६ चा मुक्काम रानवड येथे तर ३१ मार्च चा मुक्काम जनार्दन स्वामी आश्रम बोराळे येथे होणार आहे तर बुधवार १ एप्रिल रोजी संध्याकाळी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले आहे तर गुरुवारी २ एप्रिल रोजी संध्याकाळी सप्तशृंगी गडावर दर्शन घेऊन नांदुरी बस स्टँडवरून पहाटे ५ वाजता शिंगणापूर कडे परतीचा प्रवास सुरू होईल.
 तरी या भव्य पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जय सप्तशृंगी माता बहुउद्देशीय सेवा संस्था श्रीक्षेत्र शिंगणापूर ते वणी सप्तशृंगी गड भव्य पालखी सोहळा आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे