महावीरांचे विचार विश्वाने समजून घेण्याची गरज – आ. आशुतोष काळे

महावीरांचे विचार विश्वाने समजून घेण्याची गरज – आ. आशुतोष काळे
कोपरगावात महावीर जयंती उत्साहात साजरी

Kopargaon vijay kapse दि ३० मार्च २०२६– सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या रथ यात्रेत सहभागी होवून आ.आशुतोष काळे यांनी भगवान महावीरांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, भगवान महावीर यांचा जगा आणि जगू द्या हा संदेश केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी गरजेचा आहे. शस्त्राने भूमी जिंकता येते पण मनं जिंकण्यासाठी आणि शांततेसाठी केवळ प्रेमाचा आणि अहिंसेचाच मार्ग स्वीकारावा लागतो. महावीरांनी दिलेला क्षमामार्ग हा दुर्बलतेचे नव्हे, तर बलवानाचे प्रतीक आहे. आजच्या आधुनिक आणि तणावपूर्ण जगात शांतता टिकवण्यासाठी महावीरांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष ट्रस्टी अजित लोहाडे, दिलीप अजमेरे, पंच आनंद काले, मोहित गंगवाल, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेश ठोळे, आनंद पहाडे, परेश ठोळे, पियुष गंगवाल, सिद्धांत गंगवाल, अनुप ठोळे, मुनीष ठोळे, रवी ठोळे, सुरेंद्र ठोळे, नीरज कासलीवाल, सचिन ठोळे, प्रितम गंगवाल, मानव कासलीवाल, संकेत कासलीवाल, अनंत बाज, सुयोग ठोळे, सौरभ कासलीवाल, पंकज ठोळे, पियुष पापडीवाल, दिपक गंगवाल, नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तार, राहुल शिरसाठ, वाल्मिक लहिरे, राजेंद्र वाकचौरे, शैलेश साबळे,

माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, विजय त्रिभुवन, मुकुंद भूतडा, दादा नाईकवाडे, सागर आहेर, राजेंद्र खैरनार, मनोज कडू, सुनिल फंड, शुभम काळे, मनोज नरोडे, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी, धनंजय कहार, सिद्धार्थ शेळके, निलेश बोरुडे, गणेश बोरुडे, रवींद्र राऊत, जनार्दन शिंदे, भाऊसाहेब भाबड, राजेंद्र जोशी, मयुर राऊत, सागर भागवत, विकास बेंद्रे, शुभम लासुरे, खंडागळे नाना, शाहरुख कुरेशी, पाटोळे, जगन कांबळे, मुनेष गुप्ता, आण्णा लोखंडे आदींसह जैन समाजाचे ट्रस्टी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते




