आपला जिल्हा

ना. जयकुमार रावल यांची कोल्हेंच्या शब्दाला ताकद; प्रत्येक नवीन योजनेत कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य देणार

ना. जयकुमार रावल यांची कोल्हेंच्या शब्दाला ताकद; प्रत्येक नवीन योजनेत कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य देणार
ना. जयकुमार रावल यांची कोल्हेंच्या शब्दाला ताकद; प्रत्येक नवीन योजनेत कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य देणार
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० मार्च २०२६कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन भूमिपूजन व विविध विकासकामांचे लोकार्पण प्रसंगी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी कोपरगाव येथे राज्यातील सर्व नवीन योजनेत कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य दिले जाईल असे जाहीर करत कोल्हे कुटुंबाला असणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकिय ताकद अधोरेखित केली आहे.

जाहिरात
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे स्मरण करून त्यांनी केलेली प्रकल्पाची उभारणी केली.एक आगळे वेगळे कोपरगाव मॉडेल तयार केले.अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प अभ्यासायला मिळत असतात.यावेळी संजीवनी उद्योग समूहाने एलपीजी तुटवडा जगात होत असताना आपल्या इथे सीएनजी व इथेनॉल प्रकल्पाने गती घेतली आहे.शेतकऱ्यांच्या ऊसापासून होणारी ही प्रगती केवळ अन्नदाता नाही तर शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे बोलत कौतुक केले.

जाहिरात
कोपरगावला मोठा राजकीय सामाजिक आणि नवनिर्मितीचा वारसा आहे.कोल्हे कुटुंबाने शेतकरी हिताच्या संस्थेत राजकारण न आणता काम केले याबद्दल कौतुक केले.शेतकऱ्यांना हक्काची व्यवस्था निर्माण होणार आहे.महाराष्ट्रात ज्या चांगल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यात कोपरगाव एक आहे.

जाहिरात
या वेळी बिपीनदादा कोल्हे यांनी फोटोवरून राजकारण करू नये असे भाष्य केले तर जो नेता असतो त्याने फोटो पेक्षा जनतेला प्राधान्य दिले पाहिजे असे बोलून एका दगडात अनेक पक्षांचा वेध घेतला.मला वैद्यकीय अडचणी असताना आंदोलने केली तेव्हा मनात एकच होते जनतेला न्याय मिळण्यासाठी आपण लढलो पाहिजे. निवडणुका संपल्या की विरोध बाजूला ठेवत काम केले पाहिजे असेही सांगितले.मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनीही विधानसभा निवडणुकीत विरोधकांना केलेल्या मदतीची आठवण करून देत स्व.अजितदादा पवार यांच्या मनाच्या मोठेपणाची आठवण आवर्जून करून दिली.यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वात देश आणि राज्याची यशस्वी वाटचाल याबदल मत मांडले.
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी प्रभावी मुद्द्यांवर चर्चा करत अमित शाह यांच्या दूरदृष्टीच्या शेतकरी हिताच्या केंद्रीय व्यापार योजनेला गती मिळाल्यास अधिक प्रभावी काम होईल असे मत मांडले.शेतकऱ्यांना सी ए ची मदत घेऊन अतिरिक्त गुंतवणूक कुठे करावी असे सुवर्ण क्षण यावे अशा मार्च एंडच्या शुभेच्छा कोल्हे यांनी दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे