आपला जिल्हा

संजीवनी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सिंगापूर व श्रीलंका मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

संजीवनी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सिंगापूर व श्रीलंका मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणा

कोपरगावचा अभिमानः नितीन वाबळे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १ एप्रिल २०२६: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर कोपरगावच्या मातीतून एक प्रेरणादायी क्रीडा गाथा साकारली आहे. संजीवनी क्रिकेट अकॅडमी येथे नियमित सराव करणारे दिव्यांग क्रिकेटपटू नितीन किशोर वाबळे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली असून, ते आगामी सिंगापूर व श्रीलंका दौऱ्यात  भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी नितीन वाबळे यांना विशेष  निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.

जाहिरात

परिसरातील कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील गरजूंना सातत्याने भक्कम पाठिंबा देणारे श्री सुमित कोल्हे हे नेहमीच प्रेरणादायी भूमिका निभावत आले आहेत. त्यांना ही प्रेरणा माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यातून मिळालेली आहे. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्षनामुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा विकास अधिक सक्षमपणे होत आहे.

जाहिरात

    ३५ वर्षीय नितीन वाबळे हे कोपरगाव येथील रहिवासी असून ते पदवीधर आहेत. वडील किशोर वाबळे हे शेतकरी, तर आई बेबीताई वाबळे यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी झालेल्या अपघातामुळे त्यांच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. मात्र या मोठ्या  धक्क्यानंतरही त्यांनी खचून न जाता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर जीवनात पुढे वाटचाल केली. बालपणातील अपघात, पण स्वप्नांना अडथळा येऊ दिला नाही क्रिकेटची आवड लहानपणापासून असलेल्या नितीन यांनी क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत घेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. नितीन वाबळे यांनी दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ  इंडिया अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मार्च २०२६ मध्ये कोलकत्ता येथे झालेल्या निवड प्रक्रियेतून त्यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड निश्चित झाली. नितीन वाबळे हे एप्रिल २०२६ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या  टी २० मालिकेत  तसेच मे महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या  स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सिंगापूर व कोलंबो येथे होणाऱ्या  या मालिकांमध्ये ते गोलंदाजी अष्टपैलू म्हणून महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.

जाहिरात

   सत्कार प्रसंगी बोलताना  सुमित कोल्हे म्हणाले की, नितीन वाबळे यांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने जिद्दीचा आदर्श आहे. अपंगत्वावर मात करून त्यांनी देशासाठी खेळण्याची संधी मिळवली, ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. अशा खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. त्याची जिद्द आणि मेहनत अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
 नितीन वाबळे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की देशासाठी खेळण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. मी भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
   नितीन यांच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व मेहनत मोलाची ठरली आहे. याची दखल घेत सत्कार सोहळ्याात त्यांच्या प्रशिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी नितिन वाबळे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याबध्दल सत्कार केला. यावेळी नाॅन अकॅडमिक डायरेक्टर श्री डी. एन. सांगळे उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे