शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी खासदार ज्योतीताई वाघमारे यांची निवड; संघटनेला नवी ऊर्जा

शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी खासदार ज्योतीताई वाघमारे यांची निवड; संघटनेला नवी ऊर्जा
शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी खासदार ज्योतीताई वाघमारे यांची निवड; संघटनेला नवी ऊर्जा

Shirdi vijay kapse दि २ एप्रिल २०२६– शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी खासदार ज्योतीताई वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

ज्योतीताई वाघमारे या अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही विविध पदांवर काम करताना संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाची पकड अधिक भक्कम होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणींना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल. आगामी काळात पक्षाच्या विस्तारासाठी तसेच निवडणूक रणनीतीसाठीही या निर्णयाला महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.

दरम्यान, युवासेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश कपिले व शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी या नियुक्तीचे स्वागत करत सांगितले की, “ज्योतीताई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढेल. कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल.” या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्योतीताई वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. येत्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



