आपला जिल्हा

लाडक्या बहिणींना ३० एप्रिल पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ  -आ. आशुतोष काळे

लाडक्या बहिणींना ३० एप्रिल पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ  -आ. आशुतोष काळे

लाडक्या बहिणींना ३० एप्रिल पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ  -आ. आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३ एप्रिल २०२६महायुती शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु अनेक महिलांची ई-केवायसी काही तांत्रिक अडचणींमुळे होवू शकली नाही अशा महिलांसाठी हि मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात आली असून या संधीचा फायदा घेवून ई-केवायसी न केलेल्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या नियमानुसार ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. कोपरगाव मतदारसंघातील अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र काही महिलांकडून ह्या योजनेचे अर्ज भरतांना तांत्रिक चुका किंवा नजरचुकीने चुकीचे पर्याय निवडले तर काही महिलांची वैयक्तिक माहिती चुकीच्या पद्धतीने भरली गेली होती.

जाहिरात

अशा काही तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये मिळण्यास अडचणी येत होत्या अशा सर्व महिलांना आपली माहिती दुरुस्त करण्याची आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी या योजनेच्या पोर्टलवर महायुती शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेची ई-केवयासीची प्रक्रिया पूर्ण करून करायची आहे त्या महिलांना ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या ज्या पात्र महीलांना दीड हजार रुपये मिळत नाही त्या महिलांनी तातडीने ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे