आपला जिल्हा

संजीवनीच्या ९ विद्यार्थ्यांची बुहलर अँड शेर्लर व रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये नोकरीसाठी निवड

संजीवनीच्या ९ विद्यार्थ्यांची बुहलर अँड शेर्लर व रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये नोकरीसाठी निवड


    पालक व विद्यार्थी यांचा विश्वास  सार्थ ठरविणे हाच संजीवनीचा ध्यास

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६ :विविध नामांकीत कंपन्यांना नवे तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात केलेले अभियंते हवे असतात. या कंपन्यां सोबत संवाद ठेवून घेऊन कुशल अभियंते घडवीण्यास संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्राधान्य दिले जाते. त्यासाठी ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग सातत्याने कार्यरत असतो. त्याचा परिणाम म्हणून एकाच वेळी नऊ विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजवर नोकरीची संधी मिळाली. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करीत आहे, यावरून पालक व विद्यार्थी यांचा विष्वास सार्थ ठरविणे हाच संजीवनीचा ध्यास आहे, हे अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे.

जाहिरात

    बुहलर अँड शेर्लर या कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचे चार व रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीम या कंपनीने सिव्हील आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या पाच  विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक  पॅकेजवर निवड करून नोकरीची संधी दिली. बुहलर अँड शेर्लर या मुळच्या स्वीत्झर्लंन्ड मधिल बहुराष्ट्रीय  कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या गणेश  किसन गायकवाड, संतोष  मच्छिंद्र औताडे, पुजा भाऊसाहेब कोते व कल्याणी सतिश  थोरात यांची निवड केली आहे. रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीम कंपनीने सिव्हील इंजिनिअरींगच्या प्रतिक्षा सुरेश  बिलवाल, स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या ओमकार प्रकाश  डहाळे, श्रावण आदिनाथ कावळे व अमनराजे अनिमा पाटील यांची नोकरीसाठी निवड केली.

जाहिरात

   संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे   अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात


संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये उद्योगांना अभिप्रेत असणारे प्रोजक्टस् विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षात  करावे, यावर कॉलेजचा भर असतो. मला ‘अँसिस  इजलेक्ट्रॉनिक्स डेस्कटॉप’ हे इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर वापरून प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला मुलाखतीमध्ये झाला.  – गणेश  गायकवाड (विद्यार्थी, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे