आरोग्य शिबिरात २४० रुग्णाची तपासणी तर ॲम्बुलन्स लोकार्पण
आरोग्य शिबिरात २४० रुग्णाची तपासणी तर ॲम्बुलन्स लोकार्पण
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६– अंजनापुर येथील दानशूर व्यक्तिमत्व बाळासाहेब गव्हाणे पाटील तसेच दत्तात्रय गोवर्धन गव्हाणे व रोहिदास साहेबराव गव्हाणे या मित्रमंडळाच्या वतीने अंजनापूर येथील हनुमान मंदिर प्रांगणात गुरुवार दि २ एप्रिल रोजी एस जे एस व तुलसी आय हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने हनुमान जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा २४० हुन अधिकच्या रुग्णांनी घेतला लाभ.
जाहिरात
आयोजित केलेल्या या महाआरोग्य तपासणी शिबिरात १६७ गरजू रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले तसेच ३४ रुग्णांना आवश्यक त्या पुढील शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.जाहिरात
तर या प्रसंगी आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे पाटील यांच्यातर्फे अंजनापूर व पंचक्रोशीयांसाठी नवी कोरी ॲम्बुलन्स ह.भ.प एकनाथ महाराज चत्तर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आली, ही ॲम्बुलन्स अंजनापुर व पंचक्रोशीतील सर्वांसाठी मोफत देण्यात येणार असल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मित्र परीवार उपस्थित होते.जाहिरात