आपला जिल्हा

कोकमठाण येथे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते  ९५ लाखांच्या  विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

कोकमठाण येथे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते  ९५ लाखांच्या  विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

कोकमठाण येथे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते  ९५ लाखांच्या  विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६कोकमठाण येथे स्थानिक आमदार विकास निधीतून पुणतांबा रोड मारुती मंदिर ते देशमुख वस्ती या रस्त्याचे डांबरीकरण करणे (४०लाख), नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत पुणतांबा रोड ते धोंडीराम गायकवाड वस्ती ते रेलवाडी मारुती मंदिर या रस्त्याचे खडीकरण (३० लाख) व गावांतर्गत बाजारपेठ विकसित करून अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रेटिकरण करणे (२५ लाख) अशा एकूण ९५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जाहिरात

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले कीकोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असून मागील सहा वर्षात रस्ते विकासाच्या माध्यमातून दळणवळणाचे मार्ग अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. रेलवाडी रस्त्यावर असलेल्या अनेक मोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातूनचिखलातून स्थानिक नागरिकांनाशाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना प्रवास करतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता.

जाहिरात

याच रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतातून शेतमालाची ने-आण करतांना जीव घेणी कसरत करावी लागत होती अशा अनेक अडचणी रस्त्यामुळे नागरीकांना येत होत्या. तसेच पावसाळ्यात बाजारपेठेतील चिखलामुळे भाजी विक्रेत्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या अडचणी दूर करण्यासाठी रस्ते आणि बाजारपेठेच्या विकासासाठी निधी देवून नागरीकांच्या अडचणी कायमच्या मार्गी लावल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल कोकमठाण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकरराव रोहमदिलीपराव बोरणारेसुरेश जाधवराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगरमाजी संचालक बाळासाहेब बारहातेमाजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेकेकृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणेगौतम सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन विजय रक्ताटेकोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढेगोदावरी खोरेचे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक विजयराव थोरात, शिरीष लोहकणेसुदाम लोंढेसुनील लोंढेदादासाहेब साबळेशांताराम लोहकणेसंजय थोरातअरविंद रक्ताटेदिपक रोहमज्ञानेश्वर रक्ताटेसंजय थोरातविजय रक्ताटेभाऊसाहेब काशिदअनंत रक्ताटेविशाल जाधवडॉ.आशिष डूबेसिद्धार्थ लोहकणेशिवाजी कराळेशरद फटांगरेमधुकर रक्ताटेसंभाजी देशमुखसंतोष लोंढेबनेमिया सय्यदप्रशांत मोरेवाल्मीक कापेसंभाजी गायकवाडविजय थोरातसुखदेव महाजनप्रभाकर धिवरविजय देशमुखशांताराम त्रिभुवनअविनाश निकमकैलास कदमसचिन जाधवप्रभाकर आबकतुषार बाराहातेराजेंद्र रोहामअजित रक्ताटेगणेश बाराहातेअरविंद रक्ताटेसदाशिव रक्ताटेसंदीप धिवरराजेंद्र भाकरेजावेद सय्यदमधुकर रोहमप्रकाश देशमुखशिवाजी देशमुखदिलीप देशमुखदिलावर सय्यदपरसराम लोहकणेराहुल सोळसेअजय थोरातविजय भोसलेसुरेश काशिदअलाउद्दीन सय्यददत्तात्रय हाडोळेदिपक रक्ताटेरवींद्र खाडेगोरक्षनाथ लोहकणेबांधकाम विभागाचे रणजित तामखाणेराजेंद्र रोहोमग्रामसेवक विजय पाटीलराष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारीकार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे