कुंभारीसह तीन गावाच्या विजेचा समस्या संपुष्टात-आ.आशुतोष काळे

कुंभारीसह तीन गावाच्या विजेचा समस्या संपुष्टात-आ.आशुतोष काळे
कुंभारीसह तीन गावाच्या विजेचा समस्या संपुष्टात-आ.आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६-कोपरगाव मतदार संघातील अनेक सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी दिल्यामुळे त्या सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या कृषी, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या विजेच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. यामध्ये कुंभारी सबस्टेशनची देखील भर पडली असून त्यामुळे कुंभारी बरोबरच या सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या हिंगणी आणि माहेगाव देशमुख गावातील वीज ग्राहकांच्या समस्या कायमच्या संपुष्टात येणार आहेत.

कुंभारी व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विशेष प्रयत्न करून कुंभारी सबस्टेशनची निर्मिती केली होती. या सबस्टेशनवर कुंभारी, हिंगणी, माहेगाव देशमुख, सोनारी, धारणगाव आदी गावांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी होती. परंतु काळानुरूप मोठ्या प्रमाणात कृषी,व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे या सबस्टेशनची क्षमता कमी पडत असल्यामुळे वीज पुरवठा करतांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे, तांत्रिक बिघाड होऊन शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले होते व दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या.

वीज ग्राहकांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कुंभारी सबस्टेशनची क्षमता ५ एमव्हीए वरून १० एमव्हीए पर्यंत वाढवण्यासाठी उर्जा विभागाकडे पाठपुरावा करून एक कोटी निधी मिळविला होता. या निधीतून या सबस्टेशनची क्षमता वाढ करण्यात आली असून कुंभारी सबस्टेशन आता १० एमव्हीए क्षमतेचे झाले असून नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते हे सबस्टेशन १० एमव्हीए क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे कुंभारी, हिंगणी, माहेगाव देशमुख, सोनारी, धारणगाव आदी गावांना कृषी पंपासाठी टप्याटप्याने होणारा वीजपुरवठा आता एकाचवेळी आणि तो देखील दिवसा होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या भीतीपोटी जीव मुठीत धरून पाणी भरण्याची मोठी अडचण आमदार आशुतोष काळे यांनी दूर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. परंतु सबस्टेशनची क्षमता कमी असल्यामुळे एकाचवेळी सर्व वीज ग्राहकांना वीजपुरवठा करणे अशक्य होते. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात ज्या सबस्टेशनच्या क्षमता वाढविणे गरजेचे होते किंवा नवीन सबस्टेशन उभारणे गरजेचे आहे त्यासाठी उर्जा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक सबस्टेशनच्या क्षमता वाढविल्या असून काही ठिकाणी नवीन सबस्टेशन निर्मितीसाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे मतदार संघाच्या कृषी,व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या विजेच्या समस्या कायमच्या संपुष्टात येतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी महावितरणचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, कोपरगाव उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्रीम.रंजना करसाळे, सहाय्यक अभियंता योगेश सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले, संभाजीराव काळे,मा.उपसभापती अर्जुनराव काळे, अशोक निळकंठ, अर्जुन घुले, दिगंबर बढे, सतिश कदम, सुभाष बढे, संजय घुले, दिनेश साळुंके, दिलीप ठाणगे, वसंत घुले, सचिन बढे, अभिजित चकोर, चंद्रभान बढे, सोपानराव ठाणगे, शंकरराव शेळके, त्र्यंबक वाघ, संतोष मोहरे, संजय नामदेव वारुळे, संजय भागवत वारुळे, आण्णासाहेब वारुळे, अशोक वारुळे, शिवाजी भारती, अतुल निळकंठ, संतोष वाघ, अक्षय काळे, रावसाहेब काळे, बाबासाहेब पानगव्हाणे, भागिनाथ काळे, शिवाजीराव लांडगे, प्रकाश काळे, सुनिल पवार, बाळासाहेब पवार, किरण दहे, धर्मा चंदनशिव, सागर पवार, धनराज पवार, रतन भवर, दत्तात्रय पवार, मच्छिन्द्र कुदळे, राहुल पवार, विजय पवार, नितीन मोरे, बाळासाहेब काळे, रमण गायकवाड आदी मान्यवरांसह कुंभारी, हिंगणी, माहेगाव देशमुख, सोनारी, धारणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



