आपला जिल्हा
कोपरगावात पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न

कोपरगावात पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न

Kopargaon vijay kapse दि ४ एप्रिल २०२६– पूर्वीची स्त्री घराच्या राहाटात अडकलेली होती आज तीचं स्त्री शिक्षणामुळे समाजाला दिशा दर्शक अशी भूमिका बजावत आहे. समाजाचे बंधन तोडून आजची स्त्री समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून कल्पना हिरालाल महानुभाव यांचा ३२ वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्ती सोहळ्याच्या दिवशी त्यांनी लिहिलेल्या पोस्टर पैलवान या कथासंग्रहचा प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा असल्याचे प्रतिपादन वात्रटिकाकार, कवी नारायण सुमंत यांनी केले.







