आपला जिल्हा
सह्याद्री विद्यालयाचा हेरंब खाडेची नवोदय व सैनिकी स्कूल येथे निवड

सह्याद्री विद्यालयाचा हेरंब खाडेची नवोदय व सैनिकी स्कूल येथे निवड

Sangmner vijay kapse दि ५ एप्रिल २०२६- भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी हेरंब खाडे ह्याची नवोदय परीक्षा व सैनिकी स्कूलमध्ये निवड होऊन दुहेरी यशाचा झेंडा फडकविला. सह्याद्री विद्यालयामध्ये हेरंब खाडे याचा संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस.एम.खेमनर उपस्थित होते. हेरंबने मेहनतीच्या जोरावर हे दुहेरी यश संपादन केले आहे.हेरंबचे वडिल पोलीस कॉन्स्टेबल;तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. त्याचे अभ्यासाची चिकाटी व वर्गशिक्षिका श्रीमती आहेर उर्मिला मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. हेरंबने नवोदय परीक्षा निवडीची विद्यालयाची परंपरा कायम राहिली.







