आपला जिल्हा

कोपरगावच्या विकासासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सादर केलेला विश्वासनामा होतोय साकार 

कोपरगावच्या विकासासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सादर केलेला विश्वासनामा होतोय साकार 
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने गोदावरी नदीकाठी ‘निर्मल गोदावरी अभियान’
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ एप्रिल २०२६कोपरगाव शहरातील पवित्र गोदावरी नदीकाठी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि नदीकाठ प्लास्टिकमुक्त करून स्वच्छ करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने रविवार,(दि.५ ) एप्रिल रोजी ‘निर्मल गोदावरी अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांच्या सहभागातून गोदावरी नदीच्या घाटावर साफसफाई करण्यात आली असून युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सादर केलेला विश्वासनामा साकार होत आहे.

जाहिरात
या मोहिमेला कोपरगाव शहर वासियांनी मोठा प्रतिसाद देत गोदावरी नदीच्या तिरी स्वच्छता मोहिमेत मोठा हातभार लावला.या स्तुत्य उपक्रमादरम्यान जवळपास १,००० किलो प्लास्टिक व कचरा संकलित करण्यात आला. पुढील काळात नदीचे तीर व घाट स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, अशा पवित्र स्थळी कोणीही कचरा टाकू नये, नदीला प्रदूषण व प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच गोदावरी नदी ही कोपरगाववासियांची ‘आई’ असून तिला स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या वतीने करण्यात आले.

जाहिरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष नेतृत्वात युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकासाचा विश्वासनामा’ या उपक्रमातून शहर स्वच्छतेची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कोपरगाव शहरातील विविध भागांमध्ये नियमित स्वच्छता केली जात असून, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदावरी तीरावर ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजल्यापासून नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शहरवासीयांच्या सहकार्याने गोदावरी नदीच्या तीरावर साचलेला कचरा व निर्माल्य हटविण्याचे काम करण्यात आले. यावेळी सदगुरू गंगागीर महाराज कॉलेज कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता मोहिमेला मोलाची मदत केली. तसेच नदीकाठावर साचलेले निर्माल्य संकलित करण्यात आले.

जाहिरात
यावेळी उपस्थितांनी गोदावरी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्र येत नदी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. भविष्यात कचरा निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. नदीकाठावर साचणारा प्लास्टिक कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने, येत्या काळात नदीकिनारी स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक आरोग्य समिती सभापती वैभव आढाव नगरसेवक अनिल आव्हाड, आकाश वाजे ,योगेश बागुल,संजय उदावंत, दत्तू पगारे ,गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे,कैलास खैरे,वैभव गिरमे,राहुल खरात, कलविंदरसिंग डडियाल,राकेश काले,कैलास सोमासे कुणाल लोणारी ज्ञानेश्वर गोसावी सतीश रानोडे,आप्पासाहेब नवले, प्रज्वल ढाकणे, रामचंद्र साळुंके, सचिन त्रिभुवन,रोहित आढाव,रिंकेश नरोडे,अरुण बोराडे, ज्ञानेश्वर गोसावी, रोहन दरपेल,कुणाल लोणारी,दीपक कराळे, निखिल जोशी,राहुल खंडागळे, श्रीकांत जाधव,हाजी फकीर मोहम्मद पहिलवान,शुभम सोनवणे, ओम बागुल,किरण आव्हाड,दीपक पवार,नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच संत सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बंडेराव तराळ एन.एस.एस विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, व गोदामाई प्रतिष्ठानचे सदस्य व योगाचर्य विमलताई पुंडे व यांच्यासह  सर्व योगसाधक महिला. मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे