आपला जिल्हा

जिल्हा बँक असोसिएशनचे शनिवारी संगमनेर येथे सहकारी बँक संमेलन – सत्येन मुंदडा 

जिल्हा बँक असोसिएशनचे शनिवारी संगमनेर येथे सहकारी बँक संमेलन – सत्येन मुंदडा 
जिल्हा बँक असोसिएशनचे शनिवारी संगमनेर येथे सहकारी बँक संमेलन – सत्येन मुंदडा 
जाहिरात

Ahilyanagar vijay kapse दि ९ एप्रिल २०२६अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशनने येत्या शनिवारी व रविवारी दोन दिवसीय भव्य सहकारी बँक संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील भव्य  मालपाणी हेल्थ क्लब येथे आयोजित केले असल्याची माहिती बँक असोसिएशचे अध्यक्ष सत्येंन मुंदडा यांनी दिली आहे.

जाहिरात
अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या या संमेलनाच्या  उद्घाटनास संगमनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल खताळ , नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते तसेच सहकारी बँकेतील राज्याचे अनेक  पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

जाहिरात
या संमेलनात विविध प्रकारचे ज्ञानसत्र , आंतरबँक क्रीडा स्पर्धा , आयटी मीट  , मनोरंजन आदी विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे तर टेक्नॉलॉजी चा वाढता वापर लक्षात घेता या संमेलनात ए.आय चा सहकारी बँकेत वापर , सायबर सेक्युरिटी , बँकिंग यशाचे मंत्र आदी विषयावर ज्ञानसत्र आयोजीत केले आहे तसेच सर्व बँकेतील  माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांचा मेळावा संमेलनात होणार आहे. या संमेलनात जिल्ह्यातील ३० बँकातील  प्रतिनिधी उपस्थित असणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा बँक  असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा  व संमेलन समन्वयक प्रकाश राठी व सुधाकर जोशी यांनी दिली.

जाहिरात
सत्येंन मुंदडा

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे